मुंबई - घरगुती वीज ग्राहकांच्या मीटर रिडींग संदर्भातील अनेक तक्रारींवर ऊर्जा विभागाने तोडगा काढला आहे. घरगुती वीज ग्राहकांना 'स्मार्ट-मीटर' उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. मुंबई महानगर, नागपूर, पुणे, औरंगाबाद यासारख्या मोठ्या शहरांमध्ये प्राथमिक स्तरावर स्मार्ट मीटर बसविण्याचे निर्देश ऊर्जामंत्री डॉ.नितिन राऊत यांनी दिले आहेत. use of household electricity in the state is now through 'smart' meters
स्मार्ट मीटर Smart meter योजनेबाबत मंत्रालयात घेण्यात आलेल्या आढावा बैठकीमध्य़े ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत Energy Minister Dr. Nitin Raut यांनी याबाबत आज राज्यात लवकरच घरगुती वीज ग्राहकांना अत्याधुनिक पद्धतीचे मीटर देण्यासाठी राज्य सरकार पावले उचलत असून यासाठी काढण्यात आलेल्या निविदेत केंद्र सरकारने अलीकडेच जारी केलेल्या निर्देशानुसार दुरुस्ती करण्याच्या सूचना उर्जामंत्री नितिन राऊत यांनी यावेळी दिल्या.
या बैठकीस ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव दिनेश वाघमारे, महावितरणचे संचालक MSEB संजय ताकसांडे, मराविमं सूत्रधारी कंपनीचे सल्लागार उत्तम झाल्टे, महावितरणचे संचालक(वित्त) रविंद्र सावंत, तसेच महावितरणचे कार्यकारी संचालक अरविंद भादीकर उपस्थित होते.
या स्मार्ट मीटरमुळे आपणाला मोबाईलच्या Mobile सिम कार्ड Simcard वापराप्रमाणे प्रीपेड आणि पोस्टपेड रुपात हे स्मार्ट मीटर उपलब्ध असणार आहेत. यामुळे ग्राहकांना आपल्या वीज वापरावर नियंत्रण ठेवता येणार असून. वीज वापरानुसारच बिल येईल तसेच ते प्रिपेड मीटरमध्ये जितके पैसे जमा आहेत त्यानुसारच वीज वापरता येईल.
यामुळे विजेची बचत होण्यास फायदा होणार असल्याचही सांगितल जात आहे. स्मार्ट मीटरमुळे वीज बिलांमध्ये होणारी बिलवाढ थांबेल. तसेच मीटरमध्ये कोणी छेडखानी करून वीज चोरीचा प्रयत्न करीत असेल तर त्याची कल्पना मुख्यालयाला लगेच येऊन ती रोखणे शक्य होईल. यामुळे वीजचोरीस आळा बसेल. तसेच ग्राहकांना विजेचा वापर काटकसरीने करण्याचे प्रोत्साहनसुध्दा मिळेल.
दरम्यान या बेैठकीमध्ये आंबेडकर जीवनप्रकाश योजनेची व्याप्ती वाढविण्याचाही विचार करण्यात आला असून त्या संदर्भात पावले उचलण्याच्या सुचना उर्जामंत्र्यांनी दिल्या.
Edited By - Jahdish patil
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.