- सिद्धेश म्हात्रे
नवी मुंबई : खान बहादूर होरमसजी मानेकजी भिवंडीवाला ट्रस्टच्या जमिनीचे सर्वच व्यवहार आता वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. बनावट दस्तऐवज तयार करून ट्रस्टमधील काही सदस्यांनी ट्रस्टचे नाव जमिनीच्या नोंदीवरून काढून टाकले आणि ही जमीन परस्पर विकली. त्यामुळे ट्रस्टचे सुमारे 80 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. ट्रस्टच्या याच सदस्याकडून उरणचे भाजप आमदार महेश बालदी (Mahesh Baldi) यांनीही सुमारे 22 एकर जमीन खरेदी केल्याने त्यांच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. (Uran BJP MLA Mahesh Baldi in trouble)
हे देखील पहा :
या जमीन गैरव्यवहारप्रकरणी मुंबईतील एल. टी. मार्ग पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. भिवंडीवाला ट्रस्टची शेकडो (Bhiwandiwala Trust) एकर जागा नवी मुंबई परिसरात आहे. यापैकी बहुतेक जागा ही सिडकोच्या कार्यक्षेत्रात येते. ट्रस्टमधील एका सदस्याने बनावट कागदपत्रे तयार करून ट्रस्टच्या मालकीच्या जमिनीवरून ट्रस्टच्या नावाची नोंद हटवली. त्यानंतर त्याने या जागेच्या मोबदल्यात सिडकोकडे साडेबारा टक्के योजनेंतर्गत भूखंडांची मागणी केली. खोटे प्रतिज्ञापत्र तयार करून या ट्रस्टीने काही भूखंड बिल्डरांना विकून टाकले.
उरणचे (Uran) भाजप (BJP) आमदार महेश बालदी यांनीही 2018 साली भिवंडीवाला ट्रस्टची सुमारे 22 एकर जागा 16 कोटी 45 लाख रुपयांना खरेदी केली. हे सर्व व्यवहार बेकायदा झालेले असल्यामुळे याप्रकरणी ट्रस्टच्या प्रतिनिधी फरिदा दुबाश यांनी मुंबईतील (Mumbai) एल. टी. मार्ग पोलीस ठाण्यात तक्रार केली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करून या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. या चौकशीमुळे आमदार महेश बालदी यांच्यासह ट्रस्ट जागा घेणाऱ्या अन्य बांधकाम व्यावसायिकांच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. आमदार महेश बालदी यांनी दोसू भिवंडीवाला याच्याकडून जमीन घेतली असून दोसू यांचे नाव एफआयआरमध्ये आरोपी म्हणून आहे.
Edited By : Krushnarav Sathe
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.