
सुशांत सावंत -
पुणे : लोकसभेसाठी भाजपचे मिशन ४५ सुरू झालं असून त्यासाठी भाजपनं आपली यंत्रणा कामाला लावली आहे. याच मिशन अंतर्गत शरद पवारांचं (Sharad Pawar) प्राबल्य असलेल्या बारामतीवर भाजपने आता विशेष लक्ष केंद्रीत केलं आहे. (BJP's mission for Lok Sabha 45)
यासाठी १६ ते १८ ऑगस्ट दरम्यान तीन दिवस केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) बारामती दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्यादरम्यान त्या भाजप कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत. तसंच बारामती लोकसभा मतदारसंघातील संघटनात्मक स्थितीचा आणि कामांचा आढावा घेणार आहेत.
पाहा व्हिडीओ -
तसंच बारामती (Baramati) लोकसभा मतदार संघाबरोबरच शिरूर मतदार संघातही आदिवासी राज्यमंत्री रेणुका सिंह या ही दौरा करणार आहेत. महाराष्ट्रातल्या १६ मतदारसंघांत केंद्रीय मंत्री प्रवास करणार असून त्या अंतर्गत निर्मला सीतारामन बारामतीत तर केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय कुमार मिश्रा ११ ते १३ ऑगस्ट रोजी रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर आहेत. भाजपाच्या मिशन ४५ साठी चंद्रशेखर बावनकुळे संयोजक आहेत.
भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने १६ मतदारसंघ निवडले आहेत. पैकी १० मतदारसंघ शिवसेनेचं प्राबल्य असलेले आहेत त्यामुळे भाजपने आता लोकसभेसाठी आपली कंबर कसल्याचं दिसून येत आहे.
डॉ. निर्मला सीतारामन १५ ऑगस्ट रोजी बारामतीत दाखल होतील. खडकवासला, पुरंदर, बारामती, इंदापूर, दौंड आणि भोर तालुक्यांचा त्या आढावा घेणार आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या त्या त्या तालुक्यातील पदाधिकाऱ्यांसोबत बैठकही घेणार असल्याची माहिती भाजपकडून देण्यात आली आहे.
सीतारामन यांच्यासोबतच आदिवासी राज्यमंत्री रेणुका सिंह याच काळात शिरूर लोकसभा मतदारसंघाला भेट देणार आहेत. शिरूरचे लोकसभेत राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे हे प्रतिनिधित्व करत आहेत. बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे आहेत.
कोणकोणत्या जागांवर भाजप लक्ष देणार?
बुलढाणा, चंद्रपूर, हिंगोली, औरंगाबाद, पालघर, कल्याण, दक्षिण मध्य मुंबई, दक्षिण मुंबई, रायगड, बारामती, शिरूर, शिर्डी, सातारा, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि हातकणंगले असे मतदारसंघांवरती भाजप लक्ष केंद्रीत करणार आहे.
Edited By - Jagdish Patil
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.