Union Budget 2022: 161 वर्षांच्या इतिहासात अर्थसंकल्पात झालेले 10 मोठे बदल...

देशात आजवर अनेक ऐतिहासिक अर्थसंकल्प सादर करण्यात आले आहेत.
Union Budget 2022
Union Budget 2022Saam Tv

Union Budget 2022: नवी दिल्ली: 1 फेब्रुवारी 2022 ला संसदेत सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर होणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण या अर्थसंकल्प सादर करणार आहेत. देशात आजवर अनेक ऐतिहासिक अर्थसंकल्प सादर करण्यात आले आहेत. भारतात अर्थसंकल्प सादर करण्याची परंपरा ही ब्रिटिश काळात 1860 मध्ये सुरु झाली होती. त्यानंतर अर्थसंकल्पात अनेक बदल करण्यात आले आहेत (Union Budget 2022 Updates: 10 Changes In Budget In 161 Years).

Union Budget 2022
Budget Session : आजपासून संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन, विरोधकांची मोदी सरकारला घेरण्याची तयारी

1. स्वतंत्र भारताचा पहिला अर्थसंकल्प (Budget) 26 नोव्हेंबर 1947 ला तत्कालीन अर्थमंत्री आरके षणमुखम शेट्टी यांनी सादर केला होता. स्वतंत्र भारताच्या पहिल्या अर्थसंकल्पात कोणताही कर प्रस्ताव नव्हता आणि त्यात स्वातंत्र्य दिनापासून म्हणजे 15 ऑगस्ट 1947 ते 31 मार्च 1948 इतकाच साडेसात महिन्यांचा कालावधी समाविष्ट होता.

2. यापूर्वी देशात अर्थसंकल्प इंग्रजी भाषेतच छापला जायचा. पण, भारताचे तिसरे अर्थमंत्री सीडी देशमुख यांनी 1951 मध्ये अर्थसंकल्प सादर केला, तेव्हा अर्थसंकल्पाची सर्व कागदपत्रे हिंदीत (Hindi) छापण्यात आली होती.

Union Budget 2022
Budget 2022: मोबाईलसह अनेक इलेक्ट्रॉनिक वस्तू स्वस्त होऊ शकतात, सीमा शुल्कात कपात होण्याची शक्यता

3. भारताचा अर्थसंकल्प संसदेत सादर करणाऱ्या इंदिरा गांधी (Indira Gandhi) या पहिल्या महिला होत्या. 1969 मध्ये तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी त्यांच्याच सरकारचे उपपंतप्रधान आणि अर्थमंत्री मोरारजी देसाई (Morarji Desai) यांच्याकडून अर्थमंत्रालयाचा कार्यभार काढून घेतला.

4. मोरारजी देसाई हे देशातील सर्वात जास्त अर्थसंकल्प सादर करणारे व्यक्ती आहेत. त्यांनी 10 वेळा केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला आहे. यासोबतच 29 फेब्रुवारी 1964 आणि 1968 रोजी त्यांच्या वाढदिवसाला दोनदा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. यापूर्वी फेब्रुवारीच्या शेवटच्या तारखेला अर्थसंकल्प सादर केला जात होता.

5. भारतात अर्थमंत्री बजेट सादर करण्यासाठी लाल रंगाची ब्रीफकेस आणत असत, परंतु 2019 मध्ये अर्थमंत्री निर्मला सीतारामण (Nirmala Sitharaman) यांनी भारतीय लूक देत कापडाची बनवलेली ब्रीफकेस आणली आणि ती घेऊन त्या संसदेत पोहोचल्या. याला खातेवही असे नाव देण्यात आले. याची परंपरा ब्रिटनमधून स्वीकारली गेली आहे. जिथे त्याची सुरुवात बजेट प्रमुख विल्यम ग्लॅडस्टोन यांनी केली होती. ते त्यांच्या लांबलचक अर्थसंकल्पीय भाषणांसाठी प्रसिद्ध होते आणि त्यामुळे सर्व कागदपत्रे ठेवण्यासाठी त्यांना ब्रीफकेसची आवश्यकता होती.

6. मनमोहन सिंग (Manmohan Singh) यांच्या 1991 च्या अर्थसंकल्पीय भाषणात एकूण 18,650 शब्द होते. त्यापाठोपाठ अरुण जेटली यांचा 2018 च्या अर्थसंकल्पीय भाषणात 18,604 शब्द होते.

7. तत्कालीन अर्थमंत्री हिरुभाई मुळजीभाई पटेल यांनी 1977 मध्ये केवळ 800 शब्दांचे अर्थसंकल्पीय भाषण दिले होते.

8. 1999 पर्यंत अर्थसंकल्पीय भाषण फेब्रुवारीच्या शेवटच्या कामकाजाच्या दिवशी संध्याकाळी 5 वाजता सादर केले जात होते. मात्र, यशवंत सिन्हा यांनी 1999 मध्ये तो बदलून सकाळी 11 वाजता सादर केला.

9. सन 2017 पर्यंत रेल्वे अर्थसंकल्प आणि सर्वसाधारण अर्थसंकल्प स्वतंत्रपणे सादर केला जात होता. पण, 2017 मध्ये रेल्वे अर्थसंकल्प सामान्य अर्थसंकल्पात विलीन करण्यात आला आणि आता फक्त एकच अर्थसंकल्प सादर केला जातो.

10. 1950 पर्यंत अर्थसंकल्पाची छपाई राष्ट्रपती भवनात होत होती. परंतु, ते लीक झाल्यानंतर मिंटो रोड, नवी दिल्ली येथील प्रेसमध्ये छपाई सुरु झाली. त्यानंतर 1980 मध्ये ते वित्त मंत्रालयातील सरकारी प्रेसमध्ये याची छपाई होत होती.

Edited By - Nupur Uppal

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com