बदलापुरात अनधिकृत नळजोडण्या तोडणार

मजीप्राच्या धडक मोहिमेला सोमवारपासून सुरुवात
बदलापुरात अनधिकृत नळजोडण्या तोडणार
बदलापुरात अनधिकृत नळजोडण्या तोडणारअजय दुधाणे

बदलापूर - शहरातील अनधिकृत नळजोडण्या तोडण्याची धडक मोहीम महाराष्ट्र (Maharashtra) जीवन प्राधिकरणानं हाती घेतली आहे. त्यामुळे आता शहरातले शेकडो अनधिकृत कनेक्शन तोडले जाणार आहेत. बदलापूर (Badlapur) शहरात मोठ्या प्रमाणात अनधिकृत नळजोडण्या असून त्यामुळं अधिकृत जोडण्या असलेल्यांना पाणी कमी दाबानं येणं, पाणी कमी येणं असे त्रास सहन करावे लागतात.

हे देखील पहा -

या अनधिकृत जोडण्या अधिकृत करून घेण्याचं आवाहन महाराष्ट्र जीवन प्राधिकरणानं केलं होतं, तसंच त्यासाठी काही कालावधी सुद्धा देण्यात आला होता. या काळात मोठी जनजागृती सुद्धा करण्यात आली होती. मात्र नागरिकांनी आवाहनाला अल्प प्रतिसाद दिला. त्यामुळं आता अनधिकृत नळजोडण्या थेट खंडित करण्याची मोहीम महाराष्ट्र जीवन प्राधिकरणानं हाती घेतली आहे. याअंतर्गत आता शहरातील शेकडो अनधिकृत नळजोडण्या तोडल्या जाणार आहेत.

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com