Ulhasnagar News: खड्ड्याने घेतला तरुण डॉक्टरचा बळी; खड्डयात बाईक झाली स्लिप अन् अनर्थ घडला

Young Doctor Died To Potholes : उल्हासनगरात खड्ड्यामुळे एका तरुण डॉक्टरचा बळी गेल्याची घटना घडली आहे. या अपघाताचं सीसीटीव्ही फुटेजही समोर आलं आहेत.
Ulhasnagar News
Young Doctor Died To Potholessaam Tv
Published On

अजय दुधाणे, साम प्रतिनिधी

रस्त्यांवरील खड्ड्याने एका तरुण डॉक्टराचा मृत्यू झाल्याची घटना उल्हासनगरात घडलीय. खड्ड्यामुळे अनेक रस्ते अपघात होतात. आता उल्हासनगरमध्ये एका डॉक्टरचा मृत्यू झालाय. खड्ड्यात गाडी स्लिप होऊन तरुण डॉक्टरचा अपघात झाला होता. त्यात ते गंभीर जखमी झाले. रुग्णालयात त्यांना नेले असता उपचारांदरम्यान २८ वर्षीय डॉक्टरचा मृत्यू झाला. या अपघाताचं सीसीटीव्ही फुटेजही समोर आलं असून यानंतर महापालिकेच्या कारभारावर संताप व्यक्त केला जात आहे.

डॉ. हनुमंत बाबुराव डोईफोडे असं २८ वर्षीय डॉक्टराचं नाव आहे. ते उल्हासनगरच्या शासकीय मध्यवर्ती रुग्णालयात मागील दीड वर्षांपासून शिकाऊ स्त्रीरोगतज्ज्ञ म्हणून काम करत होते. रविवारी दुपारी २ वाजता दुचाकीवरून जात असताना रस्त्यातील खड्ड्यामुळे त्यांची गाडी स्लिप झाली त्यामुळे त्यांचा अपघात झाला. कल्याणच्या रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलं, मात्र अति रक्तस्त्राव आणि फुफ्फुसाला मार लागल्याने मध्यरात्री त्यांचा मृत्यू झाला.

यानंतर मध्यवर्ती रुग्णालयात शवविच्छेदन करून त्यांचा मृतदेह त्यांच्या बीड जिल्ह्यातील केज कासरी या मूळगावी नेण्यात आला. हनुमंत डोईफोडे यांच्यामागे आई-वडील, पत्नी आणि ६ महिन्यांची मुलगी असा परिवार आहे. या घटनेमुळे नागरिक हळहळ व्यक्त करत असून उल्हासनगर महापालिकेच्या कारभारावर संताप व्यक्त होतोय.

कल्याण डोंबिवलीत पार्किंग ठरतेय डोकेदुखी

कल्याण आरटीओ परिक्षेत्रात वाढत्या वाहनांच्या संख्येमुळे पार्किंगची समस्या निर्माण झाली आहे. वाहनं उभी करण्यास सोसायटीत जागा नसल्याने केडीएमसीच्या वाहनतळावर वाहने पार्क करण्यात येत आहेत. मात्र ते वाहनतळदेखील फुल झाले आहेत. तर रस्त्यावर वाहनं पार्क केली तर वाहतूक पोलीस कारवाई करतात. त्यामुळे गाड्या पार्किंग करायच्या कुठे? असा सवाल नागरिकांमध्ये उपस्थित झालाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com