VIDEO : उद्धव ठाकरे म्हणाले तिकीट नाही मिळालं तर? कार्यकर्ते एका सुरात म्हणाले...

उद्धव ठाकरे म्हणाले की, तुमच्यात एकत्र लढण्याची हिंमत आणि इच्छा आहे का? हा महत्त्वाच प्रश्न आहे.
Uddhav Thackeray
Uddhav ThackeraySaam Tv

मुंबई : महाविकास आघाडीच्या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी संबोधित करताना आगामी निवडणुकीतील तिकीट वाटपाबाबत थेट कार्यकर्त्यांनाच प्रश्न विचारला. तुम्ही एकत्र लढायला तयार आहात का? असा सवालही उद्धव ठाकरेंना उपस्थितांना विचारला.

उद्धव ठाकरे  म्हणाले की, तुमच्यात एकत्र लढण्याची हिंमत आणि इच्छा आहे का? हा महत्त्वाच प्रश्न आहे. यावर सर्व कार्यकर्त्यांनी एकमुखाने हो म्हटलं. तुम्ही तिन्ही पक्षाचे एकत्र काम करत आहात. अशावेळी आगामी ग्रामपंचायत, आमदारकी, खासदारकीचं तिकीट नाही मिळालं तर? यावर सर्व कार्यकर्त्यांनी चालेल असं उत्तर दिलं. हे चाललंच पाहिजे. कारण नाही चाललं तर हुकूमशाही चालेल, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं.  (Latest Marathi News)

Uddhav Thackeray
Pune News: पुणे हादरलं! बायको आणि 8 वर्षांच्या मुलाची हत्या; मग सॉफ्टवेअर इंजिनीअरनं स्वत:लाही संपवलं

आम्ही एकत्र भेटत असतोच, मात्र तुम्हाला देखील गावपातळीवर एकत्र भेटत राहावं लागेल. आपण एकत्र लढणारच आहेत. आगामी लोकसभा, विधानसभा डोळ्यासमोर असेल तर एक शपथ घ्या, आपल्या पदरात काही पडलं नाही तरी चालेल पण कुठल्याही निवडणुकीत भाजप आणि शिंदे गटासोबत युती करायची नाही, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com