मुंबई : एकीकडे भाजपने आरोप केल्यामुळे महाविकास आघाडीतील मंत्री जेलमध्ये जात आहेत तसेच त्यांचे घोटाळे बाहेर येत आहेत मात्र शिवसेना नेते संजय राऊतांनी (Sanjay Raut) भरगच्च पत्रकार परिषदेत आव्हान देऊही ठाकरे सरकारमधील मंत्र्यांवर सतत आरोप करणारे भाजपनेते किरीट सोमय्यांवरती (Kirit Somaiya) अद्याप कारवाई झाली नाहीच मात्र आज त्यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनाच आव्हान दिलं आहे.
संजय राऊत यांनी सोमय्या आणि त्यांचा मुलगा नील सोमय्यांवर केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांवर बोलत असताना किरीट सोमय्या यांनी उद्धव ठाकरे पोलीस आयुक्त (Commissioner of Police) झाले तरी माझ्यावर कारवाई करू शकणार नाहीत असं वक्तव्य केलं आहे.
संजय राऊतांनी किरीट आणि नील सोमय्या यांच्याविरोधात आरोप केले आहेत, नील सोमय्यांनी अटक टाळण्यासाठी कोर्टात अटकपूर्व जामिनाची याचिका दाखल केली. त्यावर आज निकाल येणार आहे. आणि याच पार्श्वभूमिवरती बोलतना सोमय्या म्हणाले, 'राज्यातील जनतेला काल कळलं की, नील सोमय्या निर्दोष आहेत. त्यांना मुंबई पोलिसांनी दोषी ठरवले नाही, त्यामुळं त्यांची बदली केली असल्याचा आरोपही त्यांनी केला.
पेड मीडिया एजन्सी सल्ला देत आहे. मोदी सरकार मागे लागलं असल्याचा दिखावा केला जात आहे. तसंच पोलीस कमिश्नरची हकालपट्टी का केली? ते सांगा, असा प्रश्नही सोमय्या यांनी उपस्थित केला. तसंच उद्धव ठाकरे पोलीस आयुक्त झाले तरीही माझ्यावर कारवाई करू शकणार नाहीत. मेधा सोमय्या, नील सोमय्यांवर कारवाई करू शकणार नाहीत. कारण घोटाळे ऊद्धव ठाकरे करतात. जे डर्टी डझन घोषित केले आहेत, त्यांच्यावर कारवाई कधी होणार ते सांगा", असा सवाल करत त्यांनी उद्धव ठाकरेंना आव्हान दिलं.
Edited By - Jagdish Patil
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.