चिन्ह मिळवण्यासाठी एकनाथ शिंदेंनी कधीच प्रयत्न केले नाहीत - उदय सामंत

'उदय सामंतला शिवसेना कधी कळली असं लोक विचारतील, पण मला बाळासाहेब कळले.'
Eknath Shinde News, Uddhav Thackeray News
Eknath Shinde News, Uddhav Thackeray NewsSaam TV
Published On

मुंबई : आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मातोश्रीवरुन पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी बंडखोरांवर निशाणा साधला, 'ज्यांनी ठाकरे कुटुंबाला त्रास दिला, खालच्या पातळीवर जाऊन टीका केली त्यांच्या मांडीला मांडी लावून आता तुम्ही बसला. त्यांच्याकडून स्वागत करुन घेता आणि वरुन आमच्याबद्दल प्रेम दाखवता हे खरं आहे की खोटं जनताच ठरवेल, असा हल्लाबोल ठाकरे यांनी पत्रकार परिषदेतून केला.

ठाकरेंच्या पत्रकार परिषदेनंतर उदय सामंत (Uday Samant) यांच्यांशी सामटीव्हीने संवाद साधला यावेळी बोलताना ते म्हणाले, 'उद्धव साहेबांच्या पत्रकार परिषदेवर मी काही बोलणं योग्य नाही. त्यांनी त्यांच मतं मांडलं. आम्ही शिंदेसोबत (Eknath Shinde) का गेलो ते जनतेला सांगितलं आहे. शिवसेनेचं खच्चीकऱण करण्याचं काम सुरु होतं. आम्ही शिवसेनेसोबत आहोत, एकनाथ शिंदेसाहेब देखील शिवसेनेतच असून बाळासाहेब ठाकरेंचा एक शिवसैनिक मुख्यमंत्री झाला आहे असं ते सांगतात.

दरम्यान, धनुष्यबाण हे चिन्ह मिळवण्याबाबतीत कुठलाच प्रयत्न शिंदे यांनी केला नाही. मी १५ दिवस शिंदेसोबत होतो. या दिवसांमध्ये कुठेही चिन्ह घ्यायची चर्चा त्यांनी केली नाही. तसंच दोन्ही गटांमधील मतभेद दुर करण्यासाठी कालावधी होता त्यावेळी मी प्रयत्न केला. मात्र, आता त्यासाठी शिंदे साहेबांशी, पंतप्रधानांशी बोलायला हवं. आपली भूमिका स्पष्ट करताना भाजपच्या लोकांना देखील विश्वासात घ्यायला पाहिजे असं सामंत यावेळी म्हणाले.

पाहा व्हिडीओ -

तसंच आमच्यावर टीका झाली त्यांच्यासोबत करायची का? या उद्धव ठाकरेंच्या वक्तव्याबाबत त्यांना प्रश्न विचारला असता सामंत म्हणाले, 'साहेबांच्या भावना समजू शकतो, मी पुढाकार घेणं योग्य नाही आमचे अधिकार आम्ही शिंदे साहेबांना दिले आहेत. तसंच मी गेलो तेव्हा २ दिवस शिंदे साहेब परत यावेत ही माझी इच्छा होती. पण मला शिंदे साहेबांची भूमिका पटली, म्हणून शिंदे साहेबांसोबत गेल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं.

शिंदे साहेब म्हणाले आहेत, हे सेना-भाजपचं सरकार आहे. उद्धव साहेबांच्या आजूबाजूला असलेले लोक त्यांना चुकीचं मार्गदर्शन करत आहेत. उदय सामंतला शिवसेना कधी कळली असं लोक विचारतील, पण मला बाळासाहेब कळले. शिंदे साहेब जी देतील ती जबाबदारी स्वीकारणार मंत्री पदावरून कोणतेही वाद नाहीत. ते अधिकार शिंदे आणि फडणवीसांना दिले आहेत. चर्चा नाही वाद नाहीत लागणार नाहीत.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com