Pune: बडे अधिकारी असल्याची खोटी ओळख सांगून तब्बल 250 तरुणींना फसवलं

केंद्र सरकारमध्ये मोठ्या पदावर अधिकारी असल्याचे सांगून मॅट्रिमोनियल साईटवरून एक नाही दोन नाही तर तब्बल २५० मुलींना फसवणाऱ्या २ अट्टल गुन्हेगारांना पिंपरी- चिंचवड पोलिसांनी अटक केली
Pune: बडे अधिकारी असल्याची खोटी ओळख सांगून तब्बल 250 तरुणींना फसवलं
Pune: बडे अधिकारी असल्याची खोटी ओळख सांगून तब्बल 250 तरुणींना फसवलंSaam Tv

पुणे: केंद्र सरकारमध्ये मोठ्या पदावर अधिकारी असल्याचे सांगून मॅट्रिमोनियल साईटवरून (Matrimonial site) एक नाही दोन नाही तर तब्बल २५० मुलींना फसवणाऱ्या (250 girls cheated) २ अट्टल गुन्हेगारांना पिंपरी- चिंचवड (Pimpri- Chinchwad Police) पोलिसांनी अटक केली आहे. या २ भामट्यांनी पुण्यामध्ये- ९१, बंगळुरूमध्ये १४२ आणि दिल्लीत गुरगाव येथील २२ मुलींची आर्थिक फसवणूक आणि फसवलेल्या मुलींपैकी अनेकींचे शारीरिक शोषण केल्याचे तपासामध्ये निष्पन्न झाले आहे.

या प्रकरणाविषयी पिंपरी- चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश (Pimpri Chinchwad) यांनी दिलेल्या माहितीनुसार, निशांत रमेशचंद नंदवाना आणि विशाल हर्षद शर्मा असे अटक (Arrested) करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. काही दिवसाअगोदर पुण्यात मनीषा धारणे नामक एक सामाजिक कार्यकर्ता तरुणी ३ पीडित तरुणींनी घेऊन त्यांच्याकडे आली आणि तिघींनाही एकाच व्यक्तीने फसविल्याची तक्रार करण्यात आली होती. यानुसार या प्रकरणाचा तपास वाकड पोलीस (Police) स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ.विवेक मुगळीकर यांच्याकडे देण्यात आले आहे. (two young men cheat over 250 young women matrimonial site pune police arrested)

हे देखील पहा-

मुगळीकर यांच्या नेतृत्वात पोलिसांच्या पथकाने वेगवेगळ्या राज्यात जाऊन आरोपी (Accused) विरुद्ध पुरावे गोळा केले आहेत. त्यांना रंगेहात जेरबंद करत त्यांच्याकडून ५० पेक्षा जास्त बनावट ओळखपत्र,अनेक मोबाईल (Mobile) आणि तब्बल ७५ लाखांची रोकड जप्त करण्यात आली आहे. हे दोघेही आरोपी एकमेकांचे मित्र होते. मात्र त्यांनी कधीही आपली मैत्री (Friendship) उघड केली नाही. दोघेही जीवनसाथी मॅट्रोमॉनियल साईटवर स्वतःला केंद्र सरकारचे (Central Government) बडे अधिकारी असल्याचे सागत असत. या दोघांनी बनावट खाते तयार केली होती.

ज्या मुलीने भेटण्याकरिता संमती दिली तिला भेटायला जातांना आलिशान गाड्यामधून जायचे, मग त्यांना लग्नाचे आमिष दाखवून विश्वास संपादन करून घ्याचे. त्यानंतर हॉटेलवर घेऊन जायचे. मात्र, त्या नंतरचा सर्व खर्च दोन्ही आरोपी मुलींनाच करायला लावत असत. जेणेकरून पकडलो गेलो तर मुलींनीच आपल्याला हॉटेलवर आणले आणि फसवले असा बनाव करायचा अशी दोघांची योजना होती. मात्र, पोलिसांनी मोठ्या शिताफीने या प्रकरणाचा तपास केला आणि दोघांचीही योजना हाणून पाडली आहे. खूपवेळा या दोघांनी काही तांत्रिक कारणाने आपल्याला नोकरीत निलंबित केले आहे आणि परत नोकरीमध्ये घेण्याकरिता पैसे लागणार असे खोटे सांगून फसवलेल्या मुलींकडून लाखो रुपये उकळले आहेत.

Pune: बडे अधिकारी असल्याची खोटी ओळख सांगून तब्बल 250 तरुणींना फसवलं
Satara: जावली बँकेत घोटाळा झाल्याचा आरोप करत महिलेचा आत्मदहनाचा प्रयत्न

एका प्रकरणात मोठ्या प्रोजेक्टकरिता ६० लाख रुपये लागणार असल्याचे सांगून आरोपी निशांत ने एका आयटी कंपनीतील एचआर असलेल्या महिलेकडून तब्बल १३ लाख रुपये उकळले आणि तिचे शारीरिक शोषण देखील केले आहे. आरोपी निशांत आणि विशालची बोलण्याची पद्धत बघून अनेक मुलींना आरोपी फार शिक्षित नसल्याचा शंका येत असायचा. मात्र, तोपर्यंत खूप वेळ झालेला असायचा कारण फसल्या गेलेल्या मुली पैशाबरोबर आपली अब्रूही या नराधमाच्या स्वाधीन करून बसत असायचे, अशा वेळी पोलिसांकडे जावे तर चौकशीचा ससेमिरा आपल्या मागे लागणार आणि समाजात आपली बदनामी होऊन लग्नाला अडचणी येतील या भीतीने पीडित मुली समोर यायच्या नाही. (two young men cheat over 250 young women matrimonial site pune police arrested)

मात्र, काही मुली धाडसाने समोर आले आणि या दोघांच पितळ उघडे पडले आहे. विकृत मानसिकतेतून शारीरिक आणि आर्थिक फसवणूक करत बनावट ओळखीच्या आधारे तब्बल २५० हुन अधिक मुलींना सावज बनविणारे हे दोघे गजाआड आहेत. ही देशात पहिलीच घटना असेल जी पीडित महिला आणि पोलिसांच्या सतर्कतेमुळे उघडकीस आली आहे. अन्यथा आणखी शेकडो मुली या दोघांच्या विकृतीला बळी पडले असते. हा प्रकार आणखी कुणाबरोबर घडू नये याकरीता लग्न जुळविणाऱ्या कुठल्याही online साईटवर आपली ओळख देतांना समोरच्या व्यक्तीविषयी पूर्ण आणि खात्रीशीर माहिती असेल तरच पुढे बोला, असे आवाहन पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी केले आहे. या कामगिरीसाठी सखोल आणि धाडसी तपास केल्या प्रकरणी पोलीस निरीक्षक संतोष पाटील आणि त्यांच्या पथकाला ६० हजारांचे परितोषिक घोषित केले आहे.

Edited By- Digambar Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com