Drown In Mithi River
Drown In Mithi Riverसुरज सावंत

Mumbai: धोकादायक ठिकाणी लघुशंका करणं आलं जीवाशी; मिठी नदीत दोघे बुडाले, एकाचा मृतदेह सापडला

Accidental Death News Mumbai: जावेद शेख आणि असिफ अशी वाहून गेलेल्या दोघांची नावे आहेत.
Published on

भुषण शिंदे

मुंबई: कुर्ला येथे दोन तरुण माहिम कोस्वे येथील मिठीत नदीत बुडाल्याची (Drown In River) घटना समोर आली आहे. माहिम दर्ग्यात दर्शनासाठी हे दोघं मित्रांसह कुर्ल्याहून (Kurla) येथे आले होते. मध्यरात्री घरी जात असताना, नैसर्गिक विधीसाठी दोघं माहीम खाडीवर उभे होते. त्याचवेळी एकाचा पाय सरकल्याने एक तरुण खाली पडला, त्याला वाचवण्यासाठी दुसरा गेला असता तोही पाण्यात बुडाला. जावेद शेख आणि असिफ अशी वाहून गेलेल्या दोघांची नावे आहेत. (Accidental Death News)

हे देखील पाहा -

मध्यरात्री भरती असल्यामुळे अग्निशमन दल आणि पोलिसांना त्यांचा शोध घेता आला नाही. मात्र ओहोटी लागताच एका तरुणाचा मृतदेह कोसवेच्या किनाऱ्यावर चिखलात अडकलेला दिसला, तर दुसऱ्याचा शोध अग्निशमन दल आणि पोलीस घेत आहेत. लघुशंकेसाठी धोकादायक ठिकाणी उभे राहणे दोन्ही तरुणांच्या जीवाशी आलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com