तरुणींनी तोकडे कपडे घातले म्हणून.... विनयभंग? (पहा व्हिडीओ)

केवळ तोकडे कपडे घातल्याचे कारण काढत मलंगगडच्या पायथ्याशी फिरण्यासाठी गेलेल्या दोन तरूण आणि दोन तरुणीना त्या ठिकाणी असलेल्या 6 ते 8 टवाळखोर मुलांनी बेदम मारहाण केली .
तरुणींनी तोकडे कपडे घातले म्हणून.... विनयभंग?  (पहा व्हिडीओ)
तरुणींनी तोकडे कपडे घातले म्हणून.... विनयभंग? (पहा व्हिडीओ)Saam Tv
Published On

प्रदीप भणगे

कल्याण : केवळ तोकडे कपडे घातल्याचे कारण काढत मलंगगडच्या Malanggad पायथ्याशी फिरण्यासाठी गेलेल्या दोन तरूण आणि दोन तरुणीना त्या ठिकाणी असलेल्या 6 ते 8 टवाळखोर मुलांनी बेदम मारहाण केली. हे तरुण इथेच थांबले नाही तर त्यांनी दोन्ही तरुणींचे कपडे फाडण्याचा प्रयत्न करत विनयभंग केल्याची घटना रविवारी संध्याकाळच्या सुमारास घडली आहे.

अचानक घडलेल्या या घटनेमुळे घाबरलेल्या या चौघांनी स्वताची सुटका करून घेत नेवाळी पोलीस चौकी गाठली. मात्र पोलिसांकडून त्यांना मेडिकल करून या तसेच इथे तक्रार होणार नाही हिल लाईन ला जा असे सांगत वाटेला लावण्यात आले. मात्र यातील पीडित तरुणीने हिम्मत न हारता सोशल मिडीयावरून या घटनेला वाचा फोडताच जागे झालेल्या पोलिसांनी या प्रकरणी मंगळवारी उशिरा गुन्हा नोंद करत आरोपीचा शोध सुरु केला आहे.

याबाबत हिललाईन पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मोहन खंदारे यांनी सांगितले की, ता. 1 ऑगस्ट रोजी सायंकाळी 6.00 वाजताच्या सुमारास दोन तरुण व दोन तरुणी मोटार सायकलने हाजी मलंग डोंगर परिसरामध्ये फिरण्यासाठी गेले होते. तेव्हा तेथे पाच ते सहा अज्ञात इसमांनी त्यांना लाकडी काठीने व ठोस्या बुक्याने मारहाण केली. त्यावरून सदर तरुण व तरुणी हे रात्री 20.00 वाजताच्या सुमारास नेवाळी चौक येथे आले. त्यावेळेस त्यांना चौकीचे अमलदार यांनी त्यांना मारहाण झाल्यामुळे मेडीकल मेमो देऊन वैद्यकीय तपासणीकरीता सेंट्रल हॉस्पिटल येथे रवाना केले.

तथापि उशीर झाल्याचे कारणास्तव वैद्यकीय तपासणी न करता ते परस्पर घरी गेले. त्यांनतर ता. २ ऑगस्ट रोजी ते हिललाईन पोलीस स्टेशन येथे आले. त्यांना ठाणे अमलदर यांनी सेंट्रल हॉस्पिटल येथे वैद्यकीय तपासणी करून घेऊन परत तक्रार देणेसाठी पोलीस ठाणे मध्ये येण्यास सांगितले. परंतु त्यांनी सेंट्रल हॉस्पिटल येथे वैद्यकीय तपासणी करून घेतली तथापि ते पोलीस स्टेशन अथवा नेवाळी चौकी येथे तक्रार देणेसाठी आले नाही. सदर घटनेबाबत आम्हास माहिती मिळाल्यानंतर ता. 3 ऑगस्ट रोजी पोलीस अधिकारी यांच्या मार्फत जखमी चेतन राठोड यांच्याशी संपर्क साधून त्यांना पोलिस ठाण्यात बोलावले. त्यावरून ता. 3 रोजी तरुणीने दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात सहा इसमाविरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबर 193/2021 भादवि कलम 354, 324, 323, 504, 506, 143, 147, 149 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला असून आरोपीचा शोध सुरू केला आहे.

कोणी कोणते कपडे घालावे हे ठरवणारे ते कोण?

कोणी काय घालावे कोणी काय घालू नये हे ठरवणारे ते कोण अशी प्रतिक्रिया भाजप नेत्या चित्र वाघ यांनी दिली आहे. तसेच जर पोलीस आमचे सुरक्षा करणार नसतील तर यापुढे महाराष्टरातील प्रत्येकाने आपल्या सुक्षेसाठी काहीतरी शस्त्र बाळगणे गरजेचं झाले आहे. असेही त्या म्हणाल्या आहेत.

Edited By-Sanika Gade

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com