सलग सुट्ट्यांमुळे नागरिक मोठ्या प्रमाणात पर्यटनस्थळी निघाले आहेत. मात्र एकाच वेळी वाहनांची संख्या वाढल्यामुळे मुंबई-पुणे मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहे. सलग दुसऱ्या दिवशी देखील ट्रॅफिक जाम कायम आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
मुंबईहून पुण्याकडे जाणाऱ्या मार्गांवर शनिवारी दुपारपासूनच वाहनांची संख्या वाढली होती. वीकेंड आणि नाताळ सणांच्या सलग सुट्ट्यांमुळे बाहेर फिरायला निघालेले मुंबईकर मात्र घाट रस्त्यात अडकले. एक्सप्रेस वे वरील बोर घाट आणि जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरील घाट रस्तात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. (Latest Marathi News)
मुंबई पुणे एक्सप्रेस वेसह जुन्या हायवेवर खोपोलीजवळ बोरघाटात वाहतूक कोंडी झाली आहे. मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर खालापूर टोल नाका ते अमृतांजन ब्रिज तसेच खंडाळा लोणावळा एक्झिटपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. मुंबई-पुणे जुन्या मार्गांवरून बोरघाटात पुण्याकडे जाताना खोपोली ते खंडाळापर्यंत 10-12 किलोमीटर पर्यंत वाहनाच्या रांगा लागल्या आहेत.
ट्रॅफिक जाममुळे नागरिकांना अनेक समस्यांना समोरं जावं लागत आहे. अनेक वाहनं देखील इंजिन गरम झाल्यामुळे बंद पडल्या होत्या. वाहतूक पोलिसांकडून वाहतूक कोंडी सोडवण्याचा प्रयत्न सुरु आहे.
मुंबई-पुणे महामार्गावर ओर्झेडे गावच्या हद्दित मुंबईहून पुण्याकडे जाणाऱ्या कारला अज्ञात वाहनाने धडक दिली. या अपघातात तीन जण गंभीर जखमी झाले आहेत, तर एक जण किरकोळ जखमी झाला आहे. जखमींना उपचारासाठी ट्रॉमा केअर सेंटर येथे दाखल करण्यात आलं आहे. सर्व प्रवासी पिंपरी-चिंचवडला निघाले होते.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.