भूषण शिंदे -
मुबंई : परिवहन मंत्री अनिल परब यांच्या मुंबईतल्या शासकीय आणि खासगी निवासस्थानावर आज ईडीने छापेमारी केली आहे. जवळपास १३ ही छापेमारी सुरू होती. ही छापेमारी संपल्यानंतर परबांनी (Anil Parab) माध्यमांशी संवाद साधला.
यावेळी बोलताना परब म्हणाले, 'दापोलीमध्ये असलेल्या साई रिसॉर्टचे सांडपाणी समुद्रात सोडण्याबाबतची तक्रार केंद्रीय पर्यावरण खात्याने (Central Environment Department) दापोली पोलीस स्टेशनमध्ये दाखल केली होती. या तक्रारीच्या कारणावरून ईडीने आज आपली १३ तास चौकशी केली असल्याची माहिती परब यांनी माध्यमांशी बोलताना दिली.
ते पुढे म्हणाले, दापोली (Dapoli) मध्ये असलेल्या साई रिसॉर्टचे सांडपाणी समुद्रात सोडण्याबाबतची तक्रार केंद्रीय पर्यावरण खात्याने दापोली पोलीस स्टेशनमध्ये (Dapoli Police Station) दाखल केली होती. मात्र, साई रिसॉर्ट अद्याप सुरू झालेला नाही. त्यामुळे सांडपाण्याचा प्रश्न उद्भवत नाही. दापोली येथे साई रिसॉर्टचे मालक सदानंद कदम आहेत. या रिसॉर्ट वरचा मालकी हक्काबाबत त्यांनी कोर्टात ही दावा केला आहे. तसंच पर्यावरणाबाबतची दोन कलमे चुकीच्या पद्धतीने लावण्यात आली असल्याचंही परब म्हणाले.
हे देखील पाहा -
दरम्यान, जे रिसॉर्ट चालूच नाही याबाबत प्रदूषण महामंडळाने निर्णय दिला. बंद असलेल्या रिसॉर्टबाबत नोटीस काढण्यात आली. या तक्रारीवरून HDD अधिकाऱ्यांनी माझ्यावर धाडी टाकल्या. तसंच आज केलेली कारवाई केवळ सांडपाण्या संदर्भात आहे. मनी लॉन्ड्रिंग (Money laundering) संदर्भात नाही तसेच आजच्या कारवाईचा सचिन वाजे (Sachin Waje) प्रकरणाशी कोणताही संबंध नाही. तसंच आज अधिकाऱ्यांनी विचारलेल्या प्रत्येक प्रश्नाला मी उत्तर दिलं आहे. यापुढेही त्यांनी विचारलेल्या प्रश्नांना मी उत्तर देईन, चौकशीला पूर्ण सहकार्य करेन या तपासात काही कागदपत्रे अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतली असल्याचं परब यांनी यावेळी सांगितलं.
Edited By - Jagdish Patil
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.