Video: ग्रीलमध्ये अडकलेल्या मुलीची चित्तथरारक सुटका; अग्निशमनाचे रेस्क्यू ऑपरेशन

पुण्यात खिडकीच्या ग्रीलमध्ये अडकलेल्या मुलीची सुखरुप सुटका अग्निशमन दलाच्या जवानांनी केली आहे. या सुटकेचा थरारक व्हिडिओ आता समोर आला आहे.
Video: ग्रीलमध्ये अडकलेल्या मुलीची चित्तथरारक सुटका; अग्निशमनाचे रेस्क्यू ऑपरेशन
Video: ग्रीलमध्ये अडकलेल्या मुलीची चित्तथरारक सुटका; अग्निशमनाचे रेस्क्यू ऑपरेशनअश्विनी जाधव केदारी
Published On

अश्विनी जाधव केदारी

पुणे : पुण्यात Pune खिडकीच्या ग्रीलमध्ये अडकलेल्या मुलीची सुखरुप सुटका अग्निशमन दलाच्या Fire brigade जवानांनी केली आहे. या सुटकेचा थरारक व्हिडिओ आता समोर आला आहे.

नेमकं काय घडले;

पुण्यातील शुक्रवार पेठेत 15 वर्षांच्या मुलीचा टेरेसवरुन ती केस वळवण्यासाठी गेली होती. परंतु तोल गेल्याने ती खाली पडली. खिडकीच्या ग्रीलवर अडकली होती. त्यानंतर अग्नीशमन दलाने या मुलीची सुखरुप सुटका केली आहे. पण पडताना ती चौथ्या मजल्याच्या खिडकीच्या ग्रीलवर जाऊन अडकली. काही सेंटिमीटर जागेमधे ही मुलगी उभी असल्याने पाहणाऱ्यांचा थरकाप उडाला. 

अग्निशमन दलाचे रेस्क्यू ऑपरेशन;

इमारतीतील लोकांनी आधी टेरेसवरून साडी खाली सोडून या मुलीला वरती खेचण्याचा प्रयत्न केला.  पण घाबरल्यामुळे ही मुलगी साडी पकडू शकत नव्हती. त्यानंतर अग्नीशमन दलाला या मुलीची सुटका करण्यासाठी पाचारण करण्यात आले. अग्नीशमन दलाच्या जवानांनी आधी सीडीच्या सहाय्याने मुलगी जिथे अडकली होती तिथपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न केला.  पण सीडी चौथ्या मजल्याच्या खिडकीपर्यंत पोहचू शकली नाही. 

त्यानंतर अग्नीशमन दलाचे दोन जवान या पाच मजली इमारतीच्या टेरेसवर गेले आणि कमरेला दोर बांधून ते चौथ्या मजल्याच्या बाल्कनीच्या ठिकाणी उतरले. त्यानंतर त्यांनी तिथे अडकलेल्या मुलीच्या कमरेलाही दोर बांधला आणि ते मुलीला घेऊन शिडीवरून सुखरुप खाली उतरले.

Video: ग्रीलमध्ये अडकलेल्या मुलीची चित्तथरारक सुटका; अग्निशमनाचे रेस्क्यू ऑपरेशन
तिला पाहून काळजाचा ठोका चुकेल की कायमचा थांबेल? येतेय अण्णांची 'शेवंता'

अशा पद्धतीने दोन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर पुणे अग्नीशमन दलाच्या जवानांनी चौथ्या मजल्याच्या सज्जात अडकलेल्या मुलीची थरारक पद्धतीने सुटका केली. दरम्यान टेरेस ला भिंत असतानाही तरुणीचा तोल कसा गेला,  त्यामुळे तरुणीचा आत्महत्येचा प्रयत्न होता का अशीही शक्यता व्यक्त करण्यात येतेय, त्या दृष्टीने पोलीस तपास करत आहे.

Edited By-Sanika Gade

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com