Mumbai News Today : मुंबईवर (26/11 Attack On Mumbai) 26/11 सारखा हल्ला करू असा धमकीचा मॅसेज (Threat) मुंबई पोलिसांना प्राप्त झाला होता. कंट्रोल रुमच्या व्हॉट्सअॅपवर एका अनोळखी नंबरवरून हा मॅसेज आला होता. आता मुंबई पोलिसांनी तातडीने तपासाची सूत्रे फिरवत एका संशयित व्यक्तीला ताब्यात घेतलं आहे. प्राप्त माहितीनुसार, विरारमधून या संशयित व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. या व्यक्तीची चौकशी महाराष्ट्र एटीएस आणि गुन्हे शाखेचे पथकांकडून केली जाणार असल्याची माहिती आहे. (Mumbai News Today)
मुंबईवर 26/11 सारखा दहशतवादी हल्ला करू असा धमकीचा मॅसेज मुंबई पोलिसांना आला होता. कंट्रोल रुमच्या व्हॉट्सअॅपवर एका अज्ञात नंबरवरून हा मॅसेज आला होता. जर तुम्ही मोबाईल नंबरचे लोकेशन ट्रेस केले तर तो भारताबाहेर दाखवेल आणि बॉम्बस्फोट मुंबईत होईल.’, असा मजकूर या मेसेजमध्ये लिहिण्यात आला होता.
मॅसेज प्राप्त होताच पोलीस दलात खळबळ उडाली होती. सणासुदीच्या काळात दहशतवादी हल्ला करण्याची धमकी आल्याने मुंबई पोलिसांनी हाय अलर्टही जाहीर केला होता. आता मुंबई पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत या प्रकरणातील एका संशयित आरोपीला अटक केली असल्याची माहिती आहे. या संशयित व्यक्तीचे नाव अद्यापही समोर आलेलं नाही. (Mumbai News Live)
मॅसेजमध्ये काय होतं?
'अभिनंदन मुंबईमध्ये हल्ला होणार आहे. मुंबईमध्ये हल्ला करण्याची तयारी करत आहे. मी पाकिस्तानमधून आहे. तुमचे काही भारतीय मुंबईला उडवण्यात माझी साथ देत आहेत. मुंबईला उडवण्याची पूर्ण तयारी झाली आहे, आता काहीच वेळ शिल्लक आहे. कधीही हल्ला करू शकतो. 26/11 चा हल्ला लक्षात असेलच. नसेल तर आता पुन्हा एकदा पाहा. ही फक्त धमकी नाही तर प्रत्यक्षात येतोय', असा धमकीचा मॅसेज मुंबई पोलिसांना आला होता.
Edited By - Satish Daud
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.