कल्याण जवळील मलंगगडच्या ओढ्यात दूषित पाण्याने हजारो मासे मृत्युमुखी

कल्याण जवळील मलंगगड परिसरात असलेल्या कळवले कुंभार्ली शेलार पाडा येथील ओढ्यात मोठ्या प्रमाणात मासे मृतावस्थेत आढळले आहेत.
कल्याण जवळील मलंगगडच्या ओढ्यात दूषित पाण्याने हजारो मासे मृत्युमुखी
कल्याण जवळील मलंगगडच्या ओढ्यात दूषित पाण्याने हजारो मासे मृत्युमुखी प्रदीप भणगे
Published On

प्रदीप भणगे

कल्याण : कल्याण जवळील मलंगगड परिसरात असलेल्या कळवले कुंभार्ली शेलार पाडा येथील ओढ्यात मोठ्या प्रमाणात मासे मृतावस्थेत आढळले आहेत विशेष म्हणजे पाण्यावर तेलाचे तवंग आणि सफेद फेसाचे आल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे स्थानिकांनी परिसरातील पोल्ट्री फार्ममुळे हा प्रकार घडल्याचे सांगितले आहे. त्यामुळे प्रदूषणास कारणीभूत असलेल्या या पोल्ट्री फार्मवर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. Thousands fishes died in Malanggad stream near Kalyan

हे देखील पहा -

हजारोंच्या संख्येने मासे मृत्युमुखी पडले असतानाच शेकडो खेकडे देखील दगावले आहेत. मात्र हे मृतावस्थेत असलेले मासे आणि खेकडे या परिसरातील आदिवासींनी उल्हासनगर, कल्याण आणि आजूबाजूच्या शहरांसह ग्रामीण भागात देखील विक्रीसाठी नेले असल्याचा धक्कदायक प्रकार ग्रामस्थांनी सांगितलं आहे.

कल्याण जवळील मलंगगडच्या ओढ्यात दूषित पाण्याने हजारो मासे मृत्युमुखी
२५ वर्षे उलटली तरी आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीत वाढ नाही !

त्यामुळे सध्या या परिसरात प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र एवढी मोठी घटना होऊन देखील प्रदूषण नियंत्रण महामंडळाने कोणत्याही प्रकारची गांभीर्याने दखल घेतली नसल्याने ग्रामस्थांनी सांगितले. जर हे मासे नागरिकांनी खाल्ल्यास त्याची मोठी विषबाधा होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे दोन दिवस परिसरातील नागरिकांनी नदीमधील मासे खाऊ नयेत असे आवाहन ग्रामस्थांनी केले आहे.

Edited By : Krushnarav Sathe

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com