तेलाचे भाव गगनाला भिडू लागल्याने चोरांचा चक्क तेलाच्या डब्यावर डल्ला
तेलाचे भाव गगनाला भिडू लागल्याने चोरांचा चक्क तेलाच्या डब्यावर डल्लाअजय दुधाणे

तेलाचे भाव गगनाला भिडू लागल्याने चोरांचा चक्क तेलाच्या डब्यावर डल्ला

किराणा दुकानाबाहेरून डब्बा चोरताना चोरटा सीसीटीव्हीत कैद
Published on

उल्हासनगर - कोरोना Corona प्रादुर्भावामुळे दोन वर्षात अनेकांच्या नोकऱ्या गेल्या, अनेक जण बेरोजगार झाले त्यात महागाई वाढत चालली असून तेल Oil,गॅसचे Gas भाव गगनाला भिडू लागल्याने संसाराचा गाडा आता पुढे कसा रेटायचा असा प्रश्न अनेकांपुढे पडला आहे. त्यामुळे चोरी,दरोड्याचे प्रकार वाढू लागले आहेत. या उदारणाचा असाच एक प्रत्यय उल्हासनगर Ulhasnagar मध्ये आला आहे.त्यात एका व्यक्तीने तेल विकत घेणे परवडत नसल्याने एका व्यक्तीने दुकानाबाहेर ठेवलेला 15 किलोचा तेलाचा डब्बाच चक्क चोरून घेऊन गेला आहे. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीत CCTV कैद झाल्याचे समोर आले आहे.

हे देखील पहा -

उल्हासनगरच्या कॅम्प ३ मधील खट्टणमल चौकात चोइथराम किराणा स्टोअर नावाचं दुकान आहे. या दुकानाबाहेर काही साहित्य नेहमीप्रमाणे दुकानदाराने ठेवलं होतं. दुपारच्या सुमारास एक चोरटा या दुकानाबाहेर आला आणि तिथून हा तेलाचा डबा हळूच उचलून तिथून पोबारा केला. जाताना हा चोरटा रिक्षा थांबवून रिक्षेने निघून गेला. हा प्रकार दुकानातल्या सीसीटीव्हीत कैद झाला आहे. उल्हासनगरात सध्या दररोज कुठे न कुठे चोरीच्या घटना घडत असतात. दुचाकी, सोनसाखळी अशा चोऱ्या शहरात नित्याच्या झाल्या आहेत. मात्र तेलाचे भाव आता गगनाला भिडू लागल्याने संसाराचा गाडा आता पुढे कसा रेटायचा असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

तेलाचे भाव गगनाला भिडू लागल्याने चोरांचा चक्क तेलाच्या डब्यावर डल्ला
भाद्रपदी बैल पोळ्याच्या तोंडावर बाजारपेठ बंद...

त्यामुळे चोरी,दरोडे चे प्रकार वाढू लागले आहेत. या उदारणाचा असाच एक प्रत्यय उल्हासनगर मध्ये आला आहे. त्यात एका व्यक्तीने तेल विकत घेणे परवडत नसल्याने दुकानाबाहेर ठेवलेला 15 किलोचा तेलाचा डब्बाच चक्क चोरून घेऊन गेला आहे. तेलाचे डब्बेही असे चोरीला जाऊ लागले, तर आता करावं तरी काय? असा प्रश्न व्यापाऱ्यांना पडला आहे.

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com