'गांधीजी आपले दैवत'; कालीचरण अटकेवर आक्षेप घेण्याचं कारण नाही - प्रवीण दरेकर

'महात्मा गांधी हे आपले दैवत आहेत. कुणी गांधींवरती आक्षेपार्ह व्यक्तव्य करत असेल तर त्याला शिक्षा करणे चुकीचे नाही.'
'गांधीजी आपले दैवत'; कालीचरण अटकेवर आक्षेप घेण्याचं कारण नाही - प्रवीण दरेकर
'गांधीजी आपले दैवत'; कालीचरण अटकेवर आक्षेप घेण्याचं कारण नाही - प्रवीण दरेकरSaam TV
Published On

सुशांत सावंत -

मुंबई : भाजप नेते प्रवीण दरेकरांनी यांनी आज माध्यमांशी बोलताना राज्य सरकारवरती सडकून टीका केली आहे. मालवण महोत्सव आयोजित करणं म्हणजे 'लोकासांगे ब्रम्हज्ञान स्वतः कोरडे पाषाण' अशी सरकारची अवस्था असल्याचं ते यावेळी बोलताना म्हणाले. दरम्यान ओमिक्रॉन हा सत्ता टिकवण्याला वरदान आहे अस न समजता लोकांसाठी उपाययोजना करा मालवण महोत्सव स्वतः पर्यावरण मंत्री भरवत असतील तर त्यांना बोलण्याचा अधिकार नाही अशा शब्दात त्यांनी टीका केली. (No reason to object Kalicharan's arrest - Praveen Darekar)

'गांधीजी आपले दैवत'; कालीचरण अटकेवर आक्षेप घेण्याचं कारण नाही - प्रवीण दरेकर
स्वतंत्र बुद्धी ही RSS च्या विचारधारेसाठी घातक - सचिन सावंत

राणेंची राजकीय दहशत कधीच नव्हती -

तसंच त्यांनी शरद पवारांच्या (Sharad Pawar) वक्तव्याबाबत प्रश्न विचारला असता ते म्हणाले आज काय उद्या काय होणार यावर भाष्य केलेलं चांगलं, मात्र शरद पवारांच्या वक्तव्यावरुन अजित दादा आणि पवार साहेबामध्ये समन्वय नसल्याचं दिसून येत आहे. शिवाय नितेश राणेंना निवडणूक प्रक्रियेपासून लांब ठेवायचे यासाठीच सरकारचा सर्व खटाटोप सुरु असल्याचही ते म्हणाले. तसंच नारायण राणे यांची राजकीय दहशत कधीच नव्हती त्यांचा दरारा आहे तो कालही होता आणि आजही आहे विरोधीपक्ष नेता म्हणून त्यांनी राजकीय दरारा निर्माण केला आहे मात्र यामुळे जर दीपक केसरकरांच्या पोटात दुखत असेल तर त्याला औषध नाही असा टोलाही प्रवीण दरेकरांनी (Pravin Darekar) केसरकरांना लगावला.

हे देखील पहा -

दरम्यान आज सकाळी अटक करण्यात आलेल्या कालीचरण (kalicharan maharaj arrrest) महाराजाबाबत त्यांना प्रश्न विचारला असता दरेकर म्हणाले, 'महात्मा गांधी हे आपले दैवत आहेत. कुणी गांधींवरती आक्षेपार्ह व्यक्तव्य करत असेल तर त्याला शिक्षा करणे चुकीचे नाही. त्यामुळे कालीचरण यांच्या अटकेवर आक्षेप घेण्याचे कारण नाही.'

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com