"...तर महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू केली जाऊ शकते"; चंद्रकांत पाटलांचे मोठे विधान (पहा Video)

"नियमांमध्ये बदल आत्ता करुन तुम्ही त्यांच्याकडे तारीख मागत आहेत. परंतु यापूर्वी घटनेप्रमाणे त्यांनी दोनदा तारीख दिली पण तुम्ही विधानसभा अध्यक्षांची निवडणूक घेतली नाही.
"...तर महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू केली जाऊ शकते"; चंद्रकांत पाटलांचे मोठे विधान (पहा Video)
"...तर महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू केली जाऊ शकते"; चंद्रकांत पाटलांचे मोठे विधान (पहा Video)saam Tv

मुंबई : "नियमांमध्ये बदल आत्ता करुन तुम्ही त्यांच्याकडे तारीख मागत आहेत. परंतु यापूर्वी घटनेप्रमाणे त्यांनी दोनदा तारीख दिली पण तुम्ही विधानसभा अध्यक्षांची निवडणूक घेतली नाही. हा राज्यपालांनी (Bhagat Sing Koshyari) दिलेल्या तारखेला विधानसभा अध्यक्ष निवडणूक न घेणं हा राज्यपालांचा आणि पर्यायानं घटनेचा अवमान असतो. घटनेचा अवमान केल्याच्या मुद्द्यावरही राष्ट्रपती राजवट लागू शकते, की तुम्ही घटनेचा अवमान केला आहे" असं मोठं वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि आमदार चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी केलं आहे.

"मला या चर्चेमध्ये पडायचं नाही. राज्यपाल हे एक स्वायत्त पद आहे, त्यांनी काय करायचं हे तेच ठरवतील," असं चंद्रकांत पाटील पुढे म्हणाले आहेत. दरम्यान, विधानसभा अध्यक्षाच्या निवडणुकीवरून राज्यात सध्या राज्यात राजकारण तापलेले आहे. आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकातं पाटील यांनी याच मुद्द्यावरून राज्य सरकारवर (Thackeray Government) टीका केली आहे. "तर नियमांमध्ये बदल करून तुम्ही तारीख मागत आहात. दोनदा पत्रे देऊन देखील तुम्ही विधानसभा अध्यक्षाची निवडणुक घेतली नाही, असे करून त्यांनी राज्यापालांचा आणि घटनेचा अवमान केला आहे आणि त्यामुळे कदाचित राष्ट्रपती राजवट लागू होऊ शकते, असा अंदाज चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला आहे.

"...तर महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू केली जाऊ शकते"; चंद्रकांत पाटलांचे मोठे विधान (पहा Video)
मस्तच ! सांगलीत 9 वर्षीय मुलीने 25 मिनिटामध्ये केला ब्रायडल मेकअप

पहा व्हिडीओ-

चंद्रकांत पाटील यांनी बोलत असताना, इतर अनेक मुद्द्यांवरून राज्य सरकारवर टीका केली आहे. स्थानिक स्वराज्य संस्था कधी होणार? वर्षभरापासून निवडणूका पेंडीग आहेत. निवणुकांचा खेळखंडोबा सुरु आहे. 6 जिल्हा परिषदा मधील निवडणूका ओबीसी राजकीय वादामुळे ते रद्द झाल्या. सगळे गोंधळ राज्य सरकार करत आहे. यांच्या गोंधळीची यादी आहे तर पीएचडी होईल इतके गोंधळ राज्य सरकारने केले आहेत, असा टोलाही त्यांनी लगावला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com