मस्तच ! सांगलीत 9 वर्षीय मुलीने 25 मिनिटामध्ये केला ब्रायडल मेकअप
मस्तच ! सांगलीत 9 वर्षीय मुलीने 25 मिनिटामध्ये केला ब्रायडल मेकअप विजय पाटील

मस्तच ! सांगलीत 9 वर्षीय मुलीने 25 मिनिटामध्ये केला ब्रायडल मेकअप

ब्रायडल मेकअप (Bridal Makeup) अर्थात वधूचा मेकअप करणे ही काही सोपी गोष्ट नाही. पण हीच अवघड कला सांगलीतील एका 9 वर्षीय मुलीने आत्मसात केली आहे.

विजय पाटील

सांगली : ब्रायडल मेकअप (Bridal Makeup) अर्थात वधूचा मेकअप करणे ही काही सोपी गोष्ट नाही. पण हीच अवघड कला सांगलीतील (sangli news marathi) एका 9 वर्षीय मुलीने आत्मसात केली आहे. धैर्या प्रशांत भाटे असे या मुलीचे नाव असून तिने काल सांगलीत आयोजित फेस्टिव्हल मध्ये ब्रायडल मेकअपचा स्टेज शो (Stage Show) केला. अवघ्या 25 मिनिट मध्ये धैर्याने एका मुलीचा ब्रायडल मेकअप पूर्ण करुन दाखवला आहे. इतक्या लहान मुलीने ब्रायडल मेकअप केलेल्याची नोंद अद्याप पर्यत तरी कुठे नाही. 

हे देखील पहा-

नॉर्मल मेकअप हा साधारण 4 ते 5 तास टिकतो, पण ब्रायडल मेकअप हा 24 तास टिकतो. त्यामुळे हा मेकअप करताना अनेक बारकावे देऊन हा मेकअप करावा लागतो. चेहऱ्यावर डिटेल वर्क करावं लागतं. शिवाय या मेकअपचे सामान ओळखणे, फाऊंडेशन, लायनर, या गोष्टी व्यवस्थित करणे गरजेचे असते.

मस्तच ! सांगलीत 9 वर्षीय मुलीने 25 मिनिटामध्ये केला ब्रायडल मेकअप
मस्तच ! सांगलीत 9 वर्षीय मुलीने 25 मिनिटामध्ये केला ब्रायडल मेकअपविजय पाटील
मस्तच ! सांगलीत 9 वर्षीय मुलीने 25 मिनिटामध्ये केला ब्रायडल मेकअप
मस्तच ! सांगलीत 9 वर्षीय मुलीने 25 मिनिटामध्ये केला ब्रायडल मेकअपविजय पाटील

धैर्याची आई ब्युटी सलून चालवतात. त्यामुळे धैर्याला देखील लहानपणापासून मेकअप करण्याची आवड जडली. यामुळे केवळ 9 व्या वर्षी धैयाने ही ब्रायडल मेकअपची कला अवगत केल्याने तिचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com