ठेकेदारांचा शालेय पोषण आहाराच्या तांदळावर डल्ला, चिमुकल्यांच्या तोंडच्या घासाची चोरी?

तांदळाच्या पोत्यांचे वजन करण्याची मागणी केली असता, 50 किलो तांदळाच्या प्रत्येक पोत्यात 7 किलोची घट असल्याचे निर्देशास आले.
School Nutrition Diet
School Nutrition DietSaam TV
Published On

पुणे : ग्रामीण भागातील गरीब, आदिवासी कुटुंबांची आर्थिक परिस्थिती हलखीची असल्याने, त्या कुटुंबातील मुले शालेय पोषण आहाराच्या निमित्ताने (School Nutrition Diet) शाळेत शिक्षण घेतात. त्यातून चिमुकल्या मुलांमध्ये शिक्षणाची गोडी निर्माण व्हावी यासाठी राज्य सरकारकडुन शालेय पोषण आहार योजना सुरु करण्यात आली. यामध्ये मुलांना शाळेतच तांदुळाची खिचडी तयार करुन दिली जात होती त्यामुळे तांदळाच्या साठ्याची नोंद होत नव्हती आणि याचाच फायदा घेऊन ठेकेदार आणि पुरवठादार तांदळाची चोरी करु लागले.

खेड तालुक्यात (Khed Taluka) 468 शाळांमध्ये अंदाजे 14 टना तांदळाचा पुरवठा सुरु आहे. काही भागात तांदुळ पुरवठा झालाय त्याही ठिकाणी प्रत्येक पोत्याच्या वजनात घट आहे मागच्या दोन वर्षात कोरोना महामारीच्या संकटात शाळा बंद होत्या या काळातही तांदुळ पुरवठादाराकडुन तांदळाचा पुरवठा कमी करण्यात आल्याचे शिक्षक आणि शाळा समितींच्या निदर्शनास आले. यावेळी सात महिन्याचा एकत्र तांदुळ (Rice) शाळांमध्ये पुरवठा होत असताना शिक्षकांनी सतर्क होऊन तांदळाच्या पोत्यांचे वजन करण्याची मागणी केली आणि 50 किलो तांदळाच्या प्रत्येक पोत्यात 7 किलोची घट असल्याचे निर्देशास आले.

School Nutrition Diet
Narendra Modi: पुण्यात लागले "गो बॅक मोदी" चे होर्डिंग

राज्य सरकारच्या शिक्षण विभागाची शालेय पोषण आहार योजना नेहमीच चर्चेचा विषय झालीय या योजनेत घरी तांदूळ देण्यापासून ते शाळेत भोजन देण्यापर्यंत अनेक वेळा बदल होत गेले मात्र यामध्ये कंत्राटदार आणि शिक्षण यंत्रणांचे पोषण झाले या योजनेचे काम पाहण्यासाठी मंत्रालयापासून तालुक्यापर्यंत वेगवेगळे अधिकारी नेमले आहेत. परंतु त्यांना योजनेच्या अडीअडचणी कधी दिसतच नाहीत का असा प्रश्न या निमित्ताने उपस्थीत होत आहे.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com