दिवा : कल्याण ग्रामीण विधानसभा मतदार संघातील आणि ठाणे महानगरपालिका हद्दीतील शिळ - दिवा रस्त्याची अत्यंत दुरावस्था झाली असून प्रंचड मोठे खड्डे पडले आहे. त्यामुळे रस्त्यावरून वाहने चालवणे देखील कठीण झाले आहे. सदर रस्ता हा ठाणे पालिकेतील प्रमुख रस्ता असून या रस्त्यावरच प्रभाग समितीचे कार्यालय देखील आहे. तरी सुद्धा या रस्त्यावरील खड्डे बुजवले गेले नसल्यामुळे मनसेने आंदोलन केले होते. तर रस्त्याची झालेली दुरावस्थेची बातमी साम टीव्हीने दाखवली होती. अखेर या रस्त्याच्या कामाला आता सुरुवात होणार आहे.
हे देखील पहा :
खा.डॉ. श्रीकांत शिंदे आज दिव्यातील आपला दवाखाना आणि नीलेश पाटील यांच्या कार्यालयाच्या उद्घाटनासाठी आले होते. यावेळी त्यानी शीळ-दिव्याचे काम हे मास्टिक अफ्लाट पद्धतीने करण्यात येणार असून रस्त्याची रुंदी सुद्धा वाढण्यात येणार आहे, अशी माहिती दिली. तसेच या रस्त्यासाठी 36 कोटी मंजूर करून आणले आहेत आणि येत्या काही दिवसात या रस्त्याचे काम सुरू होईल असे खा.डॉ. शिंदे यांनी साम टीव्हीशी बोलताना सांगितले. यावेळी गोपाळ लांडगे, रमाकांत मढवी, दर्शना म्हात्रे, चरण म्हात्रे, निलेश पाटील, अंकिता पाटील, जयंता म्हात्रे आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
दिव्यात 800 कोटींची विकासकामे सुरु
दिव्यात 800 कोटींची विकासकामे सुरु असल्याचे खा.डॉ.श्रीकांत शिंदे यांनी सांगितले. यामध्ये रस्त्यांच्या सीमेंट कॉंक्रीटीकरणासाठी सुमारे 500 कोटी, मलःनिस्सारण वाहिन्यांच्या कामासाठी 250 कोटी, जलवाहिन्यांसाठी 221 कोटी मजूर असून कामे सुरू आहेत आणि नव्याने 50 कोटीचा निधी राज्य सरकारकडून मंजुर करुन घेण्यात आला असल्याचे खा.शिंदे यांनी सांगितले.
दिव्यात आपल्या दवाखाण्याचे उद्घाटन
खा.डॉ. श्रीकांत शिंदे आज दिव्यातील आपला दवाखाना आणि नीलेश पाटील यांच्या कार्यालयाच्या उद्घाटणासाठी आले होते. दिव्यात 4 ठिकाणी आपला दवाखाना याचे उद्घाटन करण्यात आले.
Edited By : Krushnarav Sathe
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.