डोंबिवली : कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेची (केडीमसीची) निवडणूक कधीही लागू शकते. त्यामुळे राष्ट्रवादीने पक्ष मजबूत करण्याचे काम सुरू केले आहे. याच धर्तीवर कल्याण आणि कल्याण ग्रामीणमधील माजी नगरसेवकांना आज राष्ट्रवादी (NCP) पक्षात प्रवेश देण्यात आला. गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश झाला. (The strength of the NCP increased; Admission former BJP corporators and workers in kalyan)
हे देखील पाहा -
कल्याण - डोंबिवलीमधील (Kalyan - Dombivali) माजी अपक्ष नगरसेवक कुणाल पाटील, माजी भाजपा (BJP) नगरसेविका सुनीता खंडागळे, एमआयएम माजी नगरसेविका तांजिला मौलवी, उर्मिला गोसावी आणि ठाणे जिल्हा एमआयएमचे (AIMIM) अध्यक्ष फैजल जलाल यांचा आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करण्यात आला. हा प्रवेश मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या उपस्थितीत झाला. यावेळी माजी खा. आनंद परांजपे, डॉ. वंडारशेठ पाटील, दत्तात्रय वझे उपस्थित होते.
अपक्ष नगरसेवक कुणाल पाटील (Kunal Patil) यांचा प्रवेश आज राष्ट्रवादी झाल्याने कल्याण ग्रामीण मध्ये राष्ट्रवादी ताकद वाढली आहे. तर एमआयएमच्या पदाधिकारी यांचा प्रवेश केल्याने कल्याण पश्चिम मध्ये राष्ट्रवादी ताकत वाढण्यासाठी मदत होणार आहे. एकीकडे शिवसेना भाजपचे नगरसेवक फोडत असताना दुसरीकडे आता राष्ट्रवादीने सुद्धा हम किसेसे कम नही असा संदेश दिला आहे.
Edited By - Akshay Baisane
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.