'सतीश उके कुणाचे वाझे? उकेंनी लुटलेल्या संपत्तीचा संबंध मंत्रालयाशी जोडला आहे का?'

'ED वर संशय व्यक्त करतात कोण आहे सतिश उके? जमिनी बळकवण्याचा धंदा, खोटे निकाह नामा बनवण्याचा धंदा, ब्लॅक मेल करण्याचा धंदा; हे 27 जानेवारी 2022 अंजनी पोलीस स्टेशनमध्ये आरोपी आहेत.'
Satish Uke
Satish UkeSaam TV
Published On

मुंबई : 100 कोटी वसुली प्रकरण आणि सचिन वाझेवर (Sachin Waze) झालेली कारवाई त्यावेळी तिन्ही पक्ष वाझेची पाठराखण करत होते, 12 कोटी लोकांचे सभागृह 3 दिवस बंद झाले. यावेळी मुख्यमंत्री यांनी पाठराखण केली होती. काँग्रेस पक्षाच्या प्रांत अध्यक्षांना वकील उकेंवर ईडी च्या कारवाई नंतर पत्रकार परिषद घ्यावी लागते, धाड सतीश उकेवर (Satish Uke) पडते मग तुम्हाला का धडकी भरते सतीश उकेंचे समर्थन करण्यासाठी तिन्ही पक्ष समर्थन करत आहेत असा सवाल भाजप आमदार राम कदम (Ram Kadam) यांनी महाविकास आघाडीला केला आहे.

कोण आहे सतिश उके ???

ED एका रात्रीत धाड टाकत नाही, गंभीर फसवणूक आहे काही तरी चुकीचे घडलेले आहे त्यामुळे तपास यंत्रणा काम करते. ईडी वर संशय व्यक्त करतात कोण आहे सतिश उके? जमिनी बळकवण्याचा धंदा, खोटे निकाह नामा बनवण्याचा धंदा, ब्लॅक मेल करण्याचा धंदा हे 27 जानेवारी 2022 अंजनी पोलीस स्टेशन मध्ये आरोपी आहेत ,कलम 294, 420, 423, 424, 465, 467, 468, 506 सारखे गुन्हे आहेत. तुमच्या डोळ्यासमोर गुन्हा दाखल होतो, सरकारला डोळे नाहीत आंधळे झाले आहेत का ? महाराष्ट्र सरकारच्या लाडक्या वकील महोदयांवर 2005 मध्ये 8 FIR आहेत ( सोनेगाव , गित्ती खंदान) अशी माहिती कदम यांनी पत्रकार परिषदेत सांगितली.

तो जी संपत्ती लुटीत आहे ती सतीश उके एकटाच आहे की त्याचा संबंध मंत्रालयाशी जोडले आहेत ? जसे वांझेंचे होते ? सतीश उकेच्या मागे कोण त्याचा धनी कोण ? न्यायव्यवस्थला देखील वकील जुमानत नाही? त्याच्यावर न्यायालयाची अवमान केला म्हणून सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली , अजूनही सुरू आहे. जो न्यायव्यवस्था मानत नाही त्याच्यावर हे तीन पक्ष विश्वास दाखवतात? असा सवालही कदम यांनी सरकारवर उपस्थित केला.

जी तुम्ही कारवाई करता ती पारदर्शक, मात्र ईडी कारवाई केली तर अपारदर्शक देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या विरोधात याचिका केली होती मात्र ती याचिका फेटाळली असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं. सर्वोच्च न्यायालयाने हस्तक्षेप करावा म्हणून आज कागद घेऊन पत्रकार केली आहे , ज्याच्यावर गुन्हे दाखल आहेत त्याच्यावर कारवाई करू नये ? असा सवाल त्यांनी नाना पटोलेंना केला आहे.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com