Pune Crime
Pune CrimeSaam Tv

शिपायानं विद्यार्थिनीकडे केली धक्कादायक मागणी

पिंपरी- चिंचवड शहरातील निगडी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये एक अतिशय धक्कादायक घटना घडली
Published on

पिंपरी-चिंचवड: पिंपरी- चिंचवड शहरातील निगडी (Nigdi) पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये एक अतिशय धक्कादायक घटना घडली आहे. बारावीच्या परीक्षेत पास होण्यासाठी महाविद्यालयातील (college) शिपायाने स्वतः च्याच महाविद्यालयातील एका विद्यार्थिनीकडे (student) एक विचित्र मागणी केली आहे. या प्रकरणात पीडित विद्यार्थिनीच्या तक्रारीवरून निगडी पोलिसांनी (police) विनोद बाबासाहेब चव्हाण या आरोपी शिपायाला अटक (Arrested) केली आहे.

हे देखील पाहा-

पीडित मुलगी ही अभिमान कॉलेजमध्ये ११ वीच्या वर्गात कॉमर्स शिक्षण घेत असून, आरोपी विनोद बाबासाहेब चव्हाण हा अभिमान कॉलेजमध्ये शिपाई (Peon) या पदावर कार्यरत आहे. विनोद चव्हाण याने बारावीच्या परीक्षेत पास होण्यासाठी पीडित विद्यार्थिनीला मोबाईल फोनवर मला तू..... तू..... तू...! हवी आहेस, अशी मागणी पीडित विद्यार्थिनीकडे केली आहे. विनोद चव्हाणने मोबाईलवर केलेल्या संभाषणाची ऑडिओ रेकॉर्डिंग पीडित मुलीने आपल्या मोबाईलमध्ये केली आहे.

Pune Crime
किळसवाणा प्रकार; दारुड्या मुलानेच आईकडे केली शरीरसुखाची मागणी

या घटनेमुळे पीडित विद्यार्थिनीला मोठा धक्का बसला असून, तिने घडलेला प्रकार आपल्या आई- वडिलांना सांगितल्यानंतर पीडित मुलीने निगडी पोलिस स्टेशनमध्ये धाव घेतली आहे. विनोद चव्हाण विरोधात विनयभंगाची तक्रार दाखल केली आहे. पीडित विद्यार्थिनीच्या तक्रारीवरून निगडी पोलिसांनी विनोद चव्हाण यांच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करून, त्याला तातडीने अटक केली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास निगडी पोलीस करत आहेत.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com