पुणे: 14 एप्रिलला दळवी नगर झोपडपट्टी परिसरातील मोकळ्या मैदानात रात्री पाऊने नऊ वाजता दरम्यान ही घटना घडली आहे. दळवी नगर झोपडपट्टी जवळील मोकळ्या मैदानात काहीजण हातात हत्यारे घेऊन आपापसात भांडण करत होते. त्यावेळी पोलीस शिपाई उमेश देवीचंद वानखेडे हे स्थानिक गाव गुंडाचं भांडण सोडवायला गेले.
मात्र त्यांनाच गाव गुंडाच्या टोळक्याने जबरदस्त मारहाण केली आहे. उमेश वानखेडे ह्यांनी गाव गुंडांना मी स्वतः पोलीस असल्याचं सांगून सुद्धा गाव गुंड आरोपींनी पोलीस शिपाई उमेश वानखेडे यांना दगड व लाथा - बुक्क्यांनी मारहाण करत, शिवीगाळ करून जखमी केल आहे.
या प्रकरणात चिंचवड पोलीस स्टेशनमध्ये पोलीस शिपाई उमेश वानखेडे ह्यांचा फिर्यादीवरुण प्रीतम उर्फ बिक्षू नंदू आवतारे, गौरव उर्फ कैची ज्योतीराम जोगदंड आणि आकाश शिवाजी अवतारे या तिन्ही आरोपींन विरोधात शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करून तिन्ही आरोपींना चिंचवड पोलीसांनी अटक केली आहे.
Edited By: Pravin Dhamale
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.