Pune : पुण्यातील शाळा पुन्हा Online घ्या; महापौर करणार उपमुख्यमंत्र्यांकडे मागणी

पुण्यामधील Corona रुग्णसंख्येचा मागच्या 8 दिवसांतील आढावा घेतला असून 27 डिसेंबर ते 1 जानेवारी या 5-6 दिवसांत पुण्यात रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे.
Pune : पुण्यातील शाळा पुन्हा Online घ्या; महापौर करणार उपमुख्यमंत्र्यांकडे मागणी
Pune : पुण्यातील शाळा पुन्हा Online घ्या; महापौर करणार उपमुख्यमंत्र्यांकडे मागणी Saam TV
Published On

प्राची कुलकर्णी -

पुणे : पुण्यामधील Corona रुग्णसंख्येचा मागच्या 8 दिवसांतील आढावा घेतला असून 27 डिसेंबर ते 1 जानेवारी या 5-6 दिवसांत पुण्यात रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. गेल्या आठ दिवसांत ॲक्टिव्ह रुग्णसंख्या चौपट झाली असल्याची माहिती पुणे महापालिकेचे महापौर मुरलीधर मोहोळ (Mayor Muralidhar Mohol) यांनी दिली. पुणे महापालिकेच्या कोरोना आढावा बैठकीनंतर ते माध्यमांशी बोलत असताना त्यांनी ही माहिती दिली.

Pune : पुण्यातील शाळा पुन्हा Online घ्या; महापौर करणार उपमुख्यमंत्र्यांकडे मागणी
पॉझिटिव्हिटी रेट जास्त असणाऱ्या राज्यांनी लॉकडाऊनबाबत निर्णय घ्यावा - केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री

दरम्यान नव्याने बाधित झालेल्यांपैकी लसीकरण झालेल्यांची माहिती घेतली जात असून बाधीत झालेल्या 80% लोकांनी दोन्ही डोस घेतले असल्याचे समजत असल्याचही ते म्हणाले. 309 पैकी 252 रुग्णांनी दोन्ही डोस (Vaccination) घेतले होते तसंच त्यांची लक्षणे सौम्य असल्याचही महापौरांनी सांगितलं. तर 'महापालिका कोरोना रुग्ण वाढले तरी सुसज्ज आहे. जम्बोचे स्ट्रक्चरल ॲाडिट केले आहे. 24 तासांत मशिनरी करण्याचे नियोजन गरज भासल्यास सुरु करणार' असही ते म्हणाले.

हे देखील पहा -

दरम्यान शहरात सध्या ज्यादाचे निर्बंध लावले जाणार नसले तरी आहे त्या नियमांची कडक अंमलबजावणी साठी प्रयत्न करणार असल्याचा निर्णय आज महापालिकेत (PMC) घेण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. तसंच शाळा ॲानलाईन करावी अशी मागणी महापालिका करणार असल्याचं महापौर मुरलीधर मोहोळ यांनी सांगितलें. क्वारंटाईनसाठी पुन्हा हॅाटेल सुरु करणार, वाढीव निर्बंधाबाबत उद्या अजित पवारांसमोर चर्चा करणार त्यावेळी शाळांबाबत देखील चर्चा करणार असून पालकांची भुमिका ॲानलाईन शाळा (Online School) सुरु करण्याची आहे असं त्यांनी सांगितलं.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com