Maharashtra Police News: आधी १०९ अधिकाऱ्यांच्या बदल्या, नंतर ९ अधिकाऱ्यांच्या बदल्यांना स्थगिती; २४ तासांतच बदलले आदेश

Maharashtra Police Force: या निर्णयाला २४ तासही उलटत नाही, तोच या निर्णयात मोठे बदल करण्यात आले आहेत.
Maharashtra Police Force
Maharashtra Police Forcesaam tv
Published On

Maharashtra Police Force News: महाराष्ट्र पोलिस दलात काल, सोमवारी मोठे बदल करण्यात आले होते. पोलिस उपायुक्त दर्जाच्या जवळपास १०९ अधिकाऱ्यांच्या बदल्या (Transfers) करण्यात आल्या होत्या. या निर्णयाला २४ तासही उलटत नाही, तोच या निर्णयात मोठे बदल करण्यात आले आहेत. बदली केलेल्या १०९ अधिकाऱ्यांपैकी ९ अधिकाऱ्यांच्या बदल्यांना तात्काळ स्थगिती देण्यात आली आहे. (Maharashtra Latest News)

Maharashtra Police Force
Nagpur News: नागपूरात अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; ७४.९५ लाखांचे भेसळयुक्त पदार्थ जप्त

मिळालेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र पोलिस (Maharashtra Police) दलात काही बदल करण्यात आले होते. यानुसार पोलिस उपायुक्त दर्जाच्या १०९ अधिकाऱ्यांच्या बदल्या या गृह विभागामार्फत केल्या गेल्या होत्या. यातील काही बदल्यांना आता स्थगिती देण्यात आली आहे.

१०९ पैकी १०० अधिकाऱ्यांच्या बदल्या होणार आहेत, तर या ९ अधिकाऱ्यांना वगळून इतर अधिकाऱ्यांना दिलेल्या पोस्टिंगच्या ठिकाणी हजर राहण्याचे आदेश काढण्यात आले आहेत. अप्पर पोलिस महासंचालक संजीवकुमार सिंघल यांच्या स्वाक्षरीने हे आदेश पारित करण्यात आले आहेत.

तत्काळ रूजू होण्याचे आदेश

बदली झालेल्या वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी कायदा व सुव्यवस्थेच्या पार्श्वभूमीवर नव्याने पदस्थापना मिळालेल्या ठिकाणी तत्काळ रुजू व्हावे, असे आदेश गृह विभागाने दिले आहेत. पोलिस भरतीची प्रक्रिया देखील काही दिवसांत सुरु होईल. या पार्श्वभूमीवर बदली झालेले सबंधित वरिष्ठ अधिकारी दोन-तीन दिवसांत बदलीच्या ठिकाणी जाणार आहेत.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com