Sanjay Raut : 17 तारखेच्या महामोर्चाला सरकार थांबवू शकणार नाही; राऊतांचा इशारा

17 तारखेच्या महामोर्चाला सरकार थांबवू शकणार नाही, असा इशाराच संजय राऊत यांनी दिला आहे.
Sanjay Raut
Sanjay RautSaam TV
Published On

Sanjay Raut News : महापुरूषांबाबतच्या वादग्रस्त विधानाचं प्रकरण आता दिवसेंदिवस चिघळत चाललं आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांच्यासह भाजप नेत्यांकडून झालेल्या महापुरुषांच्या अवमानाच्या निषेधार्थ 17 डिसेंबर रोजी मुंबईत विराट मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे. पण अद्याप या मोर्चाला परवानगी देण्यात आलेली नाही. यावरुन शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

Sanjay Raut
Parbhani News: दीड लाखाचे कर्ज, अल्पभूधारक शेतकऱ्याची आत्‍महत्‍या; दोन दिवसात दुसरी आत्‍महत्‍या

17 तारखेच्या महामोर्चाला सरकार थांबवू शकणार नाही, असा इशाराच संजय राऊत यांनी दिला आहे. या देशात अद्याप अधिकृतपणे हुकूमशाहीची घोषणा झालेली नाही. लोकशाही मार्गाने केलेल्या आंदोलनात सरकार आडकाठी आणू शकत नाही. राहुल गांधींची भारत जोडो यात्राही एकाप्रकारे मोर्चा आहे,” असं संजय राऊत म्हणाले आहेत.

“महाराष्ट्रातील विषय फार गंभीर आहेत. घटनाकत्मक पदावर बसलेला व्यक्ती छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुले या आमच्या दैवतांचा अपमान खुलेआम करतात आणि त्याचं समर्थन सरकार करत आहे. हे अत्यंत निषेधार्ह आहे. याविरोधात मोर्चा काढू नये का? असा सवाल देखील राऊतांनी यावेळी केली.

Sanjay Raut
Viral Video : दुसरा जन्मच मिळाला! बस अंगावरून गेली तरीही वृद्ध बचावला, पाहा CCTV

मोर्चा काढू नये असं वाटत होतं तर राज्यपालांना हटवायला हवं होतं. छत्रपतींचा अपमान करणाऱ्या तुमच्या राष्ट्रीय प्रवक्त्यांवर कारवाई करायला हवी होती मात्र अजून पर्यंत ती कारवाई झाली नाही त्यामुळे आम्ही मोर्चा काढणारच,” असा इशारा संजय राऊतांनी दिला आहे.

शनिवारी निघणाऱ्या मोर्चाला कार्यकर्ते नक्कीच येतील. हा महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा विषय आहे अस्मितेचा विषय आहे. महाराष्ट्राचा सातत्याने अपमान होत आहे. सरकार तोंडाला कुलूप लावून बसलं आहे. पण जनता तोंडाला कुलूप लावून बसलेली नाही. जनता 17 तारखेला घोषणा देईल, गर्जना करेल. या गर्जना दिल्लीच्या तख्तापर्यंत जाईल, असा दावाही राऊतांनी केला.

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com