फेसबुकवर मैत्री करून लुटणारी टोळी पोलिसांच्या गजाआड

फेसबुकवर मैत्री करून लुटणाऱ्या टोळीला पवई पोलिसांनी उत्तर प्रदेश्च्या नोएडा येथून अटक केली आहे.
फेसबुकवर मैत्री करून लुटणारी टोळी पोलिसांच्या गजाआड
फेसबुकवर मैत्री करून लुटणारी टोळी पोलिसांच्या गजाआडजयश्री मोरे
Published On

जयश्री मोरे

मुंबई - फेसबुकवर Facebook मैत्री करून लुटणाऱ्या टोळीला पवई पोलिसांनी Pavai Police उत्तर प्रदेश्च्या नोएडा Noida येथून अटक केली आहे. पवई येथील राहणारे वरिष्ठ नागरिक सुब्रमण्यम रामन वय ८४ वर्षे यांची वेतन मेगन नावाच्या अनोळखी महिलेसोबत फेसबुकवर एप्रिल महिन्यात मैत्री झाली. त्यांच्यात संभाषण सुरू झाले.भारतात कोरोनाची Corona रुग्ण संख्या जास्त असल्याने त्यांना मदत म्हणून मी तुमच्या बँकेच्या खात्यात ब्रिटिश चलन एक लाख ३० हजार पौंड जे भारतीय चलन एक करोड चाळीस लाख रुपये पाठवते असे सांगून त्यांच्या कडून कस्टम क्लिअरन्स आणि इन्कम टॅक्ससाठी ७ राष्ट्रीय बँकेच्या खात्यात २० लाख ४७ हजार रुपये जमा करण्यास सांगितले. The gang who robbed by making friends on Facebook is in the hands of the police

हे देखील पहा -

सुब्रमण्यम यांनी हे पैसे भरल्यावर त्यांना आपली फसवणूक झाली हे कळले त्यांनी पवई पोलीस ठाण्यात याबद्दल तक्रार दिली.पोलिसांनी एक पथक तयार करून तांत्रिक दृष्ट्या तपास केला असता ३ लाख ४४ हजार रुपये नोएडा येथील राहुल तिवारी याच्या बँक खात्यात जमा झाल्याचे निष्पन्न झाले.पोलिसांचे एक पथक नोएडा या ठिकाणी गेले आणि तांत्रिक तपास करून त्याला ताब्यात घेतले. त्याची चौकशी केली असता त्याला आरोपी असिफ हुसेन याने आपल्याला खाते उघडून ४० हजार रुपये दिले असे सांगिलते. पोलिसांनी असिफ हुसेन याला ताब्यात घेतले आहे.

फेसबुकवर मैत्री करून लुटणारी टोळी पोलिसांच्या गजाआड
साताऱ्यात 18 ते 44 वयोगटातील लसीकरणासाठी रात्री मोठ्या प्रमाणात गर्दी

त्याने असिफ वसीम खान यात सामील असून याच्या सांगण्यावरून ६ बँक मध्ये पैसे भरले ह्या सगळ्या तांत्रिक बाबी तपासात १६ एटीएम कार्ड,१६ पासबुक, ६ चेक बुक, २ आधार कार्ड, गुन्ह्यात वापरलेले ४ मोबाईल हस्तगत करून नोएडा येथून अटक करून मुंबईला आणले.या टोळीचा प्रमुख मात्र फरार झाला असून त्याचा शोध घेत असल्याचे पोलीस उपायुक्त डॉ महेश्वर रेड्डी यांनी सांगिलते आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com