चुलत बहिणीचे लग्न आणि त्याची तयारी यासाठी जागे राहिलेले कुटुंब चेंबूर न्यु भारत नगर दुर्घटनेत बचावले आहे. किशोर घशिंग यांच्या कुटुंबातील 7 व्यक्ती आणि एक लहान बाळ बचावले आहे. रात्रीचे साडेबारा वाजता अचानक चेंबूर न्यु भारत नगर chembur new bharat nagar येथी बी आर सी ची BRCC भिंत कोसळली आणि ही भिंत शेजारी असलेल्या झोपड्यांवर कोसळली. या दुर्घटनेत किशोर घशिंग यांचे घर संपूर्ण मोडून गेले. घशिंग यांच्या घरात रात्री 7 लोक होती. भाचीचे लग्न असल्याने हे कुटुंब जागे होते. The family who stayed awake for their cousin's wedding and its preparations, has survived the Chembur wall collapse
रात्रीच्या सुमारास ही दुर्घटना झाली. भूस्खलन झालं आणि किशोर हे स्वतः त्यात दबले गेले होते. मात्र त्यांना बाहेर येता आलं. किशोर यांच्यासोबत त्यांचे 6 सदस्य घरात होते. त्यांच्या बहिणीचं लग्न काही दिवसातच होतं, मात्र त्याआधीच ही दुर्घटना घडली. सदस्यांना सर्वांना वाचवण्यात यश आलं, मात्र त्यांचं घर पूर्णपणे कोलमडलं आहे. घरात दगड विटांचा जागोजागी खच पडला आहे. घशिंग यांच्या शेजारचे दोन कुटुंब नष्ट झाले आहे. डोंगराखाली वसलेल्या या झोपडीला मुंबई महापालिका प्रशासनाने नोटीस BMC notice बजावत स्थलांतरित करण्यास सांगितले, मात्र स्थलांतरित कुठे व्हायचे हा पर्याय दिला जात नाही असे घशिंग सांगतात.
Edited By - Akshay Baisane
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.