मुंब्रा बायपासला जोडणाऱ्या पुलाला पडलं भलंमोठं भगदाड; रस्त्याचीही चाळण
मुंब्रा बायपासला जोडणाऱ्या पुलाला पडलं भलंमोठं भगदाड; रस्त्याचीही चाळणकल्पेश गोरडे

मुंब्रा बायपासला जोडणाऱ्या पुलाला पडलं भलंमोठं भगदाड; रस्त्याचीही चाळण

मुंब्रा बायपासला मोठं मोठे खड्डे पडले असून त्या रस्त्याची अक्षरशः दुरवस्था झाली आहे. त्यामुळे प्रवाशांना मात्र जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे.
Published on

ठाण्यातील मुंब्रा बायपासला रस्त्याला जोडणाऱ्या पुलाला भगदाड पडल्याने एकाच खळबळ उडाली आहे. मुंब्रा बायपासला मोठं मोठे खड्डे पडले असून त्या रस्त्याची अक्षरशः दुरवस्था झाली आहे. पुलाच्या वरील खड्ड्यांमधून सळया बाहेर निघाल्या आहेत त्यामुळे प्रवाशांना मात्र जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. (the bridge of connecting mumbra bypass is in bad and danger situation)

हे देखील पहा -

गेल्या काही दिवसांपासून मुंब्रा बायपासला भलेमोठे खड्डे पडले आहेत. त्यानंतर काल रात्रीच्या सुमारास मुंब्रा बायपासला जोडणाऱ्या ब्रिजला भलंमोठं भगदाड पडलेलं पाहायला मिळालं. या भगदाडातील सळया बाहेर आल्या असून पुलाच्या खालचा रस्ता स्पष्ट दिसून येत आहे. या खड्यांमुळे प्रवासी आपला जीव मुठीत धरून प्रवास करत आहेत. गेल्या वर्षी देखील अशाच प्रकारे मोठ्या प्रमाणात खड्डे पडले होते. गेल्यावर्षी हे खड्डे भरण्यासाठी सहा महिने मुंब्रा बायपास बंद ठेवण्यात आला होता आणि करोडो रुपये खर्च करण्यात आले होते. करोडो रुपये खर्च करून देखील मुंब्रा बायपासची पुन्हा अशी दुर्दशा झालेली आहे.

मुंब्रा बायपासला जोडणाऱ्या पुलाला पडलं भलंमोठं भगदाड; रस्त्याचीही चाळण
बाबासाहेबांनी इतिहासाला कधीही धक्का लावला नाही : राज ठाकरे

काल रात्री या पुलाला भगदाड पडल्यानंतर या बायपास वरून ठाण्याच्या दिशेने होणारी अवजड वाहनांची वाहतूक बंद करण्यात आली असून फक्त हलक्या वाहनांसाठी ही वाहतूक सुरू ठेवण्यात आली आहे. तर पुढील चार दिवस या रस्त्यावरील अवजड वाहनांची वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. एकंदरीत या घटनेमुळे भविष्यात मोठा अपघात होण्याची शक्यता आहे. या खड्यांमुळे प्रवाश्यांच्या जीवितास हानी झाली तर त्याला जबाबदार कोण असा सवाल यावेळी प्रवाशांनी उपस्थित केला आहे.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com