कल्याण : कल्याण जवळील मलंगगडच्या पायथ्याशी असलेल्या कुशीवली गावाजवळच्या खदानीमध्ये ब्लास्टिंग केल्यामुळे गावातील घरांना तडे गेले असून मोठ्या प्रमाणात घरांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे ब्लास्टिग थांबवावी आणि नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी करत कुशीवलीच्या ग्रामस्थांनी तसीलदार आणि पोलिसांकडे तक्रार केली आहे. (The blast in the mine shook the Kushiwali village; The walls of many houses were cracked)
हे देखील पहा -
कल्याण जवळील मलंगगडच्या पायथ्याशी असलेल्या कुशीवली गावाजवळ एका खासगी कंपनीची खदान आहे. त्यामधून दररोज मोठ्या प्रमाणात दगडाचे उत्खनन केले जाते. स्टोन कंपनीचे चालक हे दगडाचे उत्खनन करण्यासाठी ब्लास्टिंगचा वापर करत असतात. मात्र हेच ब्लास्टिंग परिसरात राहणाऱ्या गावकऱ्यांना त्रासदायक ठरत आहे. कुशीवली गावातील अनेकांच्या घरांना मोठं मोठे तडे गेले असताना देखील प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याने नागरिक चांगलेच संतापले आहेत. त्यामुळे या कंपनीचा परवाना रद्द करून तातडीने घरांचे पंचनामे करावेत आणि नुकसान भरपाई दयावी अशी मागणी ग्रामस्थांनी तहसीलदार यांच्याकडे केली आहे. तसेच याबाबतचे पत्र सुद्धा अंबरनाथ तहसीलदार आणि हिललाईन पोलिस स्टेशनला दिले आहे.
याबाबत कुशीवली गावातील ग्रामस्थ जगदीश म्हात्रे याने सांगितले की तनिष स्टोन केशर प्रा.लि. कंपनी खाण उत्खनन मौजे कुशीवली वरती पासून काही अंतरावर आहे. तेथे बोर ब्लास्ट करीत असल्याने जेव्हा ब्लास्ट होतो तेव्हा पूर्ण घर हादरुन जाते व घरातील भांडी सुध्दा पडु लागतात. जणू काही भुकंप झाला की काय असे वाटू लागते. ब्लास्टमुळे घरांना व कॉक्रीटरस्त्याला मोठ मोठयाला भेग्या पडल्या आहेत. बोर ब्लास्टमुळे दगडे लांब वर येतात यामुळे मनुष्य हानी देखील होण्याची दाट शक्यता वाढली आहे. ब्लास्टमुळे गावातील बोरवेलला असलेले पाण्याची पातळीसुध्दा कमी आहे. त्यामुळे महिलांना पिण्याच्या पाण्यासाठी देखील लांबवर वणवण करावी लागते.
ब्लास्टिंगबाबत आम्ही आमदार गणपत गायकवाड यांना आम्ही कळवलं आणि पोलीस स्टेशनला गेलो होतो. आमदार स्वतः येऊन पाहणी करून गेले त्यांनी निवेदन द्यायला सांगितलं, त्याप्रमाणे तहसीलदारांना निवेदन दिले आहे. आमची फक्त एवढीच मागणी करतो कि, जीवनाशी खेळणाऱ्या तनिष स्टोन कंपनी पूर्णता बंद व्हावी आणि आम्हाला नुकसान भरपाई द्यावी. कारण या गावात पिढ्यान-पिढ्या कुरांची घर होती. नागरिकांनी मोल मजुरी करून घरं बांधली आहेत. शासनाच्या योजनांमधून अनेकणांना घर मिळाली आहेत. त्यामुळे याची दखल नाही घेतली तर आम्ही आंदोलन करू.
Edited By - Akshay Baisane
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.