तिरंग्यावरतीच भाजपाध्यक्षांनी ठेवला पक्षाचा झेंडा; राष्ट्रवादीकडून भाजपचा निषेध!

"आधी देश, मग पक्ष, शेवटी स्वतः" अशी घोषणा देणाऱ्या भाजपने देशाला आता पक्षाच्या झेंड्याखाली गुंडाळून ठेवलं आहे.
तिरंग्यावरतीच भाजपाध्यक्षांनी ठेवला पक्षाचा झेंडा; राष्ट्रवादीकडून भाजपचा निषेध!
तिरंग्यावरतीच भाजपाध्यक्षांनी ठेवला पक्षाचा झेंडा; राष्ट्रवादीकडून भाजपचा निषेध!रश्मी पुराणिक
Published On

मुंबई : उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे जेष्ठ नेते कल्याण सिंह यांचे काल वृध्दापकाळाने निधन झाले. ते मागील काही दिवसांपासून आजारी होते. आज रविवारी लखनऊ येथे त्यांच्या निवासस्थानी देशातील वेगवेगळ्या भागातून अनेक नेत्यांसह कार्यकर्ते त्यांच्या पार्थिवाचे दर्शन घेण्यासाठी आले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदींसह अन्य भाजप नेत्यांनी त्यांच्या पार्थिवाचे दर्शन घेतले.The BJP president placed the party's flag on the Indian flag

हे देखील पहा-

दरम्यान कल्यान सिंग यांचे पार्थिव तिरंग्यामध्ये गुंडाळून ठेवलं होते आणि या तिरंग्यावरतीच भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांनी भारतीय जनता पक्षाचा झेंडा ठेवल्याने नवीन वादाला तोंड फुटले आहे याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने त्यांच्या अधिकृत फेसबुक पेजवरुन भाजपचा निषेध केला आहे.

"आधी देश, मग पक्ष, शेवटी स्वतः" अशी घोषणा देणाऱ्या भाजपने देशाला आता पक्षाच्या झेंड्याखाली गुंडाळून ठेवलं आहे. उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कल्याण सिंह यांचे निधन झाल्यानंतर त्यांना अभिवादन करत असताना भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांनी चक्क भारताच्या राष्ट्रध्वजावर भाजपचा झेंडा अंथरला.

तिरंग्यावरतीच भाजपाध्यक्षांनी ठेवला पक्षाचा झेंडा; राष्ट्रवादीकडून भाजपचा निषेध!
जत तालुक्यातील महिलांनी बांधली जयंत पाटलांना राखी; पाटील म्हणाले हा माझ्यासाठी भावूक क्षण!

विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीतच भारतीय राष्ट्रध्वजाचा हा अवमान झाला. प्रोटोकॉलप्रमाणे भारतीय ध्वजावर अन्य कोणताही ध्वज ठेवता येत नाही. 'नेशन फर्स्ट' ही घोषणा जनतेला फसवून केवळ स्वतःचा आणि स्वतःच्या पक्षाचा उद्धार करणाऱ्यांनीच आज उघडी पाडली.राष्ट्रध्वजाचा अवमान केल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भाजपचा निषेध व्यक्त करत आहे." अशी पोस्ट राष्ट्रवादीने टाकली आहे सोबत जे.पी नड्डा यांनी तिरंग्यावरती भाजपचा झेंडा ठेवल्याचा फोटोही पोस्ट केला आहे.

Edited By-Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com