Thane Traffic: महाशिवरात्रीनिमित्त ठाण्यातील वाहतुकीत बदल! घराबाहेर पडण्याआधी पाहा कोणते रस्ते बंद, कोणते सुरु?

Thane Traffic Rule For Mahashivratri: महाशिवरात्रीनिमित्त ठाण्यातील वाहतुकीच्या नियमांमध्ये बदल करण्यात आले आहे. ढोकाळी येथील शिवमंदिरात प्रचंड गर्दी होती. त्यामुळे पुढील चार दिवस वाहतूकीच्या नियमांमध्ये बदल करण्यात आले आहेत.
Thane Traffic
Thane TrafficSaam Tv
Published On

उद्या २६ फेब्रुवारी रोजी महाशिवरात्री साजरी करण्यात येणार आहे. महाशिवरात्रीनिमित्त शिवमंदिरात भाविकांची खूप गर्दी असते. ठाण्यातील ढोकळी मंदिरात नंदीबाबा मित्र मंडळाच्या वतीने महाशिवरात्रीचे आयोजन करण्यात आले आहे. महाशिवरात्री निमित्त कापूरबावडी, ढोकळी, कोलशेत,मनोरमानगर, मानपाडा भागातील हजारो भाविक दर्शनासाठी मंदिरात येतात.या परिसरात जत्रेचे आयोजन केले जाते. त्यामुळे अनेक भाविक येथे येत असतात.

Thane Traffic
Pune Ring Road: पुणेकरांची वाहतूक कोंडी फुटणार! रिंग रोड संदर्भात मोठा निर्णय, कनेक्टिव्हिटी आणखी वाढणार

ढोकळी येथील मंदिरात खूप भाविक येतात. त्यामुळे वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी वाहतूकीत बदल केले आहेत. २६ फेब्रुवारी ते १ मार्च या कालावधीत संध्याकाळी ४ ते १० या कालावधीत वाहतूकीत बदल करण्यात येणार आहे. यामुळे पर्यायी मार्गांवर वाहतूक कोंडी होऊ शकते.

ठाण्याहून घोडबंदरच्या दिशेने वाहतूक करणाऱ्या मार्गिकेवरुन नळपाडा मार्गे कोळशेतच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांना नळपाडा येथे प्रवेश बंदी असणार आहे. तेथील वाहनांना कापूरबावडी,मानपाडा पुलाखालून वळण घेऊन जावे लागणार आहे.

Thane Traffic
Vande Bharat Train : भारतीय रेल्वेची मोठी कामगिरी; वंदे भारतची आणखी एक ट्रेन रुळावर येणार, कुठून धावणार?

मानपाडा- माजिवाडा प्रभाग समिती येथून कोलशेत आणि ढोकाळीच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांना प्रवेशबंदी असणार आहे. वाहनांना आर मॉल, बाळकुम नाका किंवा दोस्ती वेस्टी काँट्री मार्गे वाहतूक करावी लागणार आहे. कोलशेत येथून कापूरबावडीच्या दिशेने प्रवास करणाऱ्यांना ढोकाळी सिग्नल येथे प्रवेशबंदी असणार आहे. त्यामुळे प्रवाशांना लोढा अमारा, मनोरमानगर, ब्रम्हांड मार्गे जावे लागणार आहे.

Thane Traffic
Pune Traffic News : शिवजयंती निमित्त पुण्यात वाहतुकीत मोठे बदल; कुठून निघणार मिरवणूक, कसा कराल प्रवास? वाचा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com