Thane: रेकी करुन घरफोडी, सराईत गुन्हेगारांना अटक, कळवा पोलिसांकडून 12 तोळे सोनं जप्त

हे गुन्हेगार सराईत असल्या कारणाने ते आपले राहण्याचे ठिकाण वारंवार बदलत होते.
Thane Crime News
Thane Crime NewsSaam Tv
Published On

ठाणे: फेरीवाला बनून सोसायट्यांमध्ये रेकी करुन दिवसाढवळ्या घरफोडी करणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांना ठाण्यातील कळवा पोलिसांनी शिताफीने अटक केली आहे. हे गुन्हेगार सराईत असल्या कारणाने ते आपले राहण्याचे ठिकाण वारंवार बदलत होते. त्यामुळे त्यांना शोधणे हे पोलिसांसमोर मोठे आव्हान होते (Thane Kalwa Police Arrest Two Robbers And Seized Gold Jewelry Of 6 Lacs).

Thane Crime News
Amravati Crime News: एकाच रात्री दोन बँका फोडण्याचा प्रयत्न, बँकेत कॅशच नसल्याने चोरटे हैराण

या दोघांना पोलिसांनी अटक (Arrest) केल्यानंतर त्यांच्याकडून तब्बल 12 तोळे वजनाचे 6 लाखाचे सोन्याचे दागिने (Gold Jewelry) हस्तगत केले आहेत. विशेष म्हणजे हे दोन्ही आरोपी सहा महिन्यापूर्वीच कारागृहातून बाहेर आले होते. त्यानंतर त्यांनी पुन्हा अशा प्रकारचा गुन्हा केला. त्यांच्या विरोधात याआधी देखील अनेक शहरांमध्ये घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत.

20 मिनिटांत साडे सहा लाखांचे दागिने लंपास

ठाण्यातील (Thane) कळवा पोलीस (Kalwa Police) ठाण्याच्या हद्दीतील मनिषानगर परिसरात राहणाऱ्या स्मिता मालवणकर या गृहिणी घरातून कामानिमित्त बाहेर गेल्या होत्या. यावेळी त्यांच्यावर पाळत ठेवून बसलेल्या आरोपींनी दिवसाढवळ्या घराचे टाळे तोडून अवघ्या 20 मिनिटांमध्ये घरातील 6 लाख 58 हजार रुपये किंमतीचे सुमारे 12 तोळे सोन्याचे ऐवज लंपास करुन पोबारा केला. स्मिता या घरी परतल्यानंतर घराचे टाळे तुटून दरवाजा उघडा होता. त्यांनी घरात पाहिले असता घरातील सर्व दागिने चोरीला गेल्याचे निदर्शनात आले. त्यानंतर त्यांनी तात्काळ कळवा पोलीस ठाण्यात धाव घेत अज्ञातांच्या विरोधात गुन्हा दाखल (Case Filed) केला.

कळवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोहर आव्हाड यांनी या घटनेची गंभीरता लक्षात घेत गुन्हा दाखल करुन सीसीटीव्हीच्या (CCTV) मदतीने आरोपींचा शोध घेण्यास सुरुवात केली. यासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक आव्हाड यांनी उप निरीक्षक के. बघडाने, सह उप निरीक्षक एम. महाजन, संजय गावडे, रामराजे, प्रदीप शिंदे, गुरव, खपाले, माळी, साठे असे एक पथक तयार केले. पोलिसांनी सीसीटीव्हीचा माघ काढत त्या आरोपींचा शोध घेतला. हे आरोपी बदलापूर येथील वांगणी परिसरात राहत असल्याचे लक्षात आले. पोलिसांनी त्या ठिकाणी छापा टाकला असता आरोपी त्या ठिकाणावरुन पळून गेले होते.

त्यानंतर पोलिसांनी पुन्हा या आरोपींचा माघ काढला असता ते नालासोपारा (Nalasopara) येथे लपून बसले असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी सीसीटीव्हीच्या मदतीने आरोपींचा मागोवा घेत मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले. ताब्यात घेतलेल्या आरोपींची पोलिसांनी कसून चौकशी केली असता हे दोघेही आरोपी हे मुळचे कर्नाटक आणि तामिळनाडू येथील रहिवाशी असल्याची माहिती समोर आली. शेखर नटराज नायर आणि देवेंद्र गणेश शेट्टी असे या दोन्ही आरोपींची नावे आहेत. हे दोघेही आरोपी हे सराईत गुन्हेगार (Accused) असून त्यांच्याविरोधात ठाण्यातील एमएफसी, बदलापूर, मुंबईतील कांदिवली, पालघर अशा विविध ठिकाणी गुन्हे दाखल आहेत.

सहा महिन्यांपूर्वीच कारागृहातून सुटका

दोन्ही आरोपींची सहा महिन्यापूर्वीच कारागृहातून सुटका होऊन बाहेर आले होते. त्यानंतर या दोघांनी पुन्हा अशा प्रकारचा गुन्हा केला आहे. या दोन्ही आरोपसोबत त्यांची एक सहकारी महिला अद्याप फरार आहे. तिचा शोध कळवा पोलीस करत आहेत. या दोन्ही आरोपींना कळवा पोलिसांनी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने या दोघांना 2 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

Edited By - Nupur Uppal

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com