शिवसेनेला मोठा धक्का! ठाण्याचे शिवसेना महापौर नरेश म्हस्केंनी दिला राजीनामा

शिवसैनिक होतो, आहे आणि राहणारच पण गेले अडीचवर्षे आपल्या संघटनेची "राष्ट्रवादी" गळचेपी चाललेय त्याचा निषेध म्हणून जिल्हाप्रमुख पदाचा राजीनामा देत आहे.
Naresh Mhaske
Naresh MhaskeSaam Tv
Published On

मुंबई - सध्या राज्यात अनेक नाट्यमय घडामोडी घडत आहे. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेतुन (Shivsena) बंड केल्यानंतर राज्यभरात शिवसेना आक्रमक झालेली पहायला मिळत आहेत. एकनाथ शिंदे यांच्या बंडाळीनंतर शिवसेनेत उभी फूट पडली आहे. त्यामुळे शिवसेनेची अंतर्गत धुसफूस चव्हाट्यावर आली आहे. एकनाथ शिंदे आणि तीसहून अधिक आमदारांच्या बंडखोरीमुळे महाविकास आघाडी सरकार धोक्यात आलं आहे. बंडखोर एकनाथ शिंदे गटाने आधी सूरत त्यानंतर गुवाहाटीत मुक्काम ठोकला आहे. त्याच्यात आता शिवसेनेला आणखी एक मोठा धक्का भेटला आहे.

एकनाथ शिंदे यांच्या समर्थनार्थ शिवसेनेचे ठाणे जिल्हाप्रमुख नरेश म्हस्के (Naresh Mhaske) यांनी राजीनामा दिला आहे. ट्विट करत त्यांनी याबाबाद माहिती दिली आहे. आपल्या ट्विटमध्ये नरेश म्हस्के म्हणाले की, भगवे आमचे रक्त तळपते,तप्त हिंदवी बाणा. जात,गोत्र अन् धर्म अमुचा शिवसेना , शिवसेना ,शिवसेना...! शिवसैनिक होतो, आहे आणि राहणारच पण गेले अडीचवर्षे आपल्या संघटनेची "राष्ट्रवादी" गळचेपी चाललेय त्याचा निषेध म्हणून जिल्हाप्रमुख पदाचा राजीनामा देत आहे. जय महाराष्ट्र!

एकनाथ शिंदे यांच्या या भूमिकेचे काही शिवसैनिक समर्थन करत आहेत. तर काही शिवसैनिकांकडून या भूमिकेला कडाडून विरोध केला जात आहे. अनेक निवडणुकांमधील राजकीय समीकरणे जुळवून आणण्यासाठी एकनाथ शिंदे यांना नरेश म्हस्के यांनी मोलाचे सहकार्य केले आहे.

Naresh Mhaske
शिंदे गटाच्या नावाने सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग; भाजप नेत्यांशी एकनाथ शिंदे करणार चर्चा

नेमकं काय आहे प्रकरण?

२० जूनला विधान परिषदेच्या मतदानानंतर एकनाथ शिंदे हे नॉट रिचेबल झाले. यानंतर शिवसेनेचे अनेक आमदारही नॉट रिचेबल झाले. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी बंड केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आणि शिवसेनेह महाविकास आघाडी अक्षरशः हादरली. सुरुवातीला एकनाथ शिंदे हे शिवसेनेच्या काही आमदारांसह सुरतमधील एका हॉटेला थांबले होते. त्यानंतर केंद्राच्या सुरक्षेत ते बंडखोर आमदारांसह २२ जूनला आसाम राज्यातील गुवाहाटीत पोहोचले. गुवाहाटीतील रेडिसन ब्ल्यू या हॉटेलात ते बंडखोर आमदारांसह थांबले आहे. आपल्यासोबत शिवसेनेचे ४० तर अपक्ष आणि इतर १० असे एकूण ५० आमदार असल्याचा दावा एकनाथ शिंदे गटाकजून करण्यात आला आहे. आज बंडाचा सहावा दिवस असून रोज नवनवीन घटना घडत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com