शिंदे गटाच्या नावाने सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग; भाजप नेत्यांशी एकनाथ शिंदे करणार चर्चा

Political Crisis In Maharashtra : काल रात्री देवेंद्र फडणवीस सुमारे १० तास मुंबई बाहेर होते. त्यानंतर आज आज पहाटे फडणवीस सागर बंगल्यावर परतले आहे.
Eknath Shinde/ Shivsena
Eknath Shinde/ ShivsenaSaam Tv
Published On

मुंबई: एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) बंडखोरी केल्यानंतर आता सत्ता स्थापनेसाठी हालचालींनी सुरुवात झाली आहे. विशेष म्हणजे शिंदे गटाच्या नावाने सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे. यासाठी भाजप नेत्यांशी चर्चेला सुरुवात होणार आहे. बंडखोर आमदारांचे नेतृत्व करणारे एकनाथ शिंदे हे भाजप नेत्यांशी चर्चा करणार आहे. दुसरीकडे भाजपच्या गोटातही हालचालींना वेग आला आहे. आतापर्यंत या सर्व घडामोडींबाबत मौन बाळगून असलेले देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) पुन्हा एकदा सक्रिय झाले आहेत. काल रात्री देवेंद्र फडणवीस सुमारे १० तास मुंबई बाहेर होते. त्यानंतर आज आज पहाटे फडणवीस सागर बंगल्यावर परतले आहे. फडणवीसांनी कुणाची भेट घेतली हे अद्याप गुलदस्त्या आहे. त्यामुळे आता फडणवीस नेहके कुणाला भेटले? याची चर्चा सुरु झाली आहे. (Eknath Shinde Latest News)

हे देखील वाचा -

Eknath Shinde/ Shivsena
Eknath Shinde News : बंडखोरांच्या गटाकडून प्रवक्त्यांची नेमणूक होणार; माध्यमांशी प्रवक्तेच बोलणार

कट्टर शिवसैनिक आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडाला आजचा पाचवा दिवस आहे. या काळात भाजपाकडून वेट अँड वॉचची भूमिका घेण्यात आली होती. तसेच या सर्वाशी आपला काही संबंध नसल्याचे भाजपाकडून सातत्याने सांगण्यात येत होते. मात्र आता भाजपा भाजपच्या गोटात हालचालींना वेग आला आहे. तसेच ठाकरे सरकार कोसळल्यास पर्यायी सरकार देण्यासाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. महाराष्टात घडत असलेल्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आज भाजपाच्या कोअर कमिटीची बैठक होणार आहे. तसेच त्यात पुढील रणनीती ठरविण्यात येणार आहे. त्याबरोबरच देवेंद्र फडणवीस हे आज रामदास आठवले तसेच भाजपाच्या इतर मित्रपक्षांची भेट घेणार असल्याची माहिती समोर आली आहे.

नेमकं काय आहे प्रकरण?

२० जूनला विधान परिषदेच्या मतदानानंतर एकनाथ शिंदे हे नॉट रिचेबल झाले. यानंतर शिवसेनेचे अनेक आमदारही नॉट रिचेबल झाले. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी बंड केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आणि शिवसेनेह महाविकास आघाडी अक्षरशः हादरली. सुरुवातीला एकनाथ शिंदे हे शिवसेनेच्या काही आमदारांसह सुरतमधील एका हॉटेला थांबले होते. त्यानंतर केंद्राच्या सुरक्षेत ते बंडखोर आमदारांसह २२ जूनला आसाम राज्यातील गुवाहाटीत पोहोचले. गुवाहाटीतील रेडिसन ब्ल्यू या हॉटेलात ते बंडखोर आमदारांसह थांबले आहे. आपल्यासोबत शिवसेनेचे ४० तर अपक्ष आणि इतर १० असे एकूण ५० आमदार असल्याचा दावा एकनाथ शिंदे गटाकजून करण्यात आला आहे. आज बंडाचा पाचवा दिवस असून रोज नवनवीन घटना घडतायतय.

Edited By - Akshay Baisane

हे देखील पाहा -

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com