ठाकरेंची युती धोक्यात? मनसे शिंदेंसोबत गेल्यानं ठाकरे भाजपसोबत?

MNS–Shinde Sena Tie-Up Raises Questions on Thackeray Alliance: मराठीसाठी ठाकरे बंधूंनी वाजत गाजत केलेली युती महिनाभरातच तुटण्याची चर्चा रंगलीय.. त्याचं नेमकं कारण काय? मनसे आणि शिंदेसेनेच्या युतीवर ठाकरेसेनेनं काय भूमिका घेतलीय...
A political storm brews as cracks appear in the much-hyped Thackeray brothers’ alliance amid KDMC power play.
A political storm brews as cracks appear in the much-hyped Thackeray brothers’ alliance amid KDMC power play.Saam Tv
Published On

मराठी अस्मितेसाठी एकत्र आल्याचा दावा करणाऱ्या ठाकरे बंधूंच्या युतीत महिनाभरातच मिठाचा खडा पडलाय... कल्याण डोंबिवलीत मनसेनं थेट ठाकरेंचे विरोधक शिंदेंसोबत घरोबा केला आणि तिथूनच ठिणगी पडली...ठाकरेसेनेनं मनसेच्या निर्णयावर संतप्त प्रतिक्रिया देत थेट शिवतीर्थ गाठलं....मात्र राज ठाकरेंनाही कल्याण डोंबिवलीतील भूमिका मान्य नसल्याचा दावा संजय राऊतांनी केलाय..

हे असं असलं तरी कल्याण-डोंबिवली महापालिकेत शिंदेसेनेसोबत जाण्याचा प्लॅन राज ठाकरेंनीच ठरवल्याची माहिती सुत्रांनी दिलीय.. राज ठाकरेंनी राजू पाटलांसह मुंबईच्या नेत्यांवर नगरसेवकांची मनं वळवण्याची जबाबदारी दिली होती.. त्यानंतर राज ठाकरेंच्या आदेशानंच रविवारी नगरसेवकांची भेट घेत शिंदेसेनेला पाठींबा देण्याबाबत समजूत काढल्याची माहिती सुत्रांनी दिलीय. तर दुसरीकडे संजय राऊतांनी भाजपसोबत युतीचे संकेत दिलेत.. तर नांदगावकरांनी मुंबईत काहीही घडू शकतं...असं सुचक वक्तव्य केलंय.

कल्याण डोंबिवलीत मनसेला सोबत घेत शिंदेंनी सत्तेचा मार्ग मोकळा केलाय.. तर मुंबईत बार्गेनिंग पॉवर वाढवण्याची रणनीती आखलीय.. त्यामुळे भाजपवर टीका करताना राज ठाकरेंनी मुंबईचं अदानीस्तान होऊ देऊ नका, असं आवाहन केलं होतं.. मात्र त्यानंतरही मनसेनं शिंदेंना साथ दिल्यानं मुंबईत उद्धव ठाकरे भाजपला साथ देऊन मनसेला शह देणार का? आणि त्यातून एकत्र राहण्यासाठी एकत्र आलेले ठाकरेंची युतीही आता तुटणार का?

याकडे राज्याचं लक्ष लागलंय.. मात्र निकालानंतर सत्तेचं समीकरण जुळवण्यासाठी विरोधकांसोबतची युती आणि आघाड्यांमुळे मतदारांचा कौल धाब्यावर बसवला जातोय. आणि त्यामुळेच महाराष्ट्राच्या राजकारणाचा आणखीच चिखल होतोय.. हे मात्र निश्चित...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com