Marathi Actor Ravindra Mahajani Life Journey: मराठी सिनेसृष्टीवर आघात करणारी बातमी नुकतीच समोर आली आहे. प्रसिद्ध मराठी अभिनेते रवींद्र हनुमंत महाजनी यांचं निधन झालं आहे. वयाच्या ७७ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
पुण्यातील मावळच्या तळेगाव दाभाडील (Pune News) आंबी येथील घरात शुक्रवारी सायंकाळी चारच्या सुमारास त्यांचा मृतदेह आढळून आला. रवींद्र महाजनी यांचा मृत्यू साधारण: तीन दिवसांपूर्वी झाला असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
त्यांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला याचे कारण अद्यापही गुलदस्त्यात आहे. १९८० चा काळ गाजवणाऱ्या रवींद्र महाजनी याचा जीवनप्रवास खूपच संघर्षाचा राहिला आहे.
अभिनय क्षेत्रात येणाऱ्या पूर्वी रवींद्र महाजनी एक टॅक्सी ड्रायव्हर म्हणून काम करत होते. त्यांनी जवळपास ३ वर्ष मुंबईत (Mumbai) टॅक्सी चालवली. पण, त्यांच्यातील कलाकार त्यांना स्वस्थ बसू देत नव्हता.
ते दिवसा वेगवगेळ्या ठिकाणी जाऊन निर्मात्यांच्या भेटी घेत आणि रात्री टॅक्सी चालवत.रवींद्र महाजनी मध्यमवर्गीय कुटुंबातील होते. ते टॅक्सी चालवतात या एका गोष्टीमुळे त्यांच्या अनेक नातेवाईकांनी त्यांच्याशी संबंध तोडले.
विशेष म्हणजे ज्यावेळी ते अभिनेता (Marathi Actor) म्हणून नावारुपाला आले त्यावेळी त्यांचे हेच नातेवाईक पुन्हा त्यांच्याशी नीट वागू लागले. रवींद्र महाजनी यांनी व्ही. शांताराम यांच्या झुंज या सिनेमातून कलाविश्वात पदार्पण केले होते.
'मुंबईचा फौजदार', 'झुंज', 'कळत नकळत', 'आराम हराम' अशा कितीरी सिनेमांमधील त्यांच्या भूमिका सुपरहिट झाल्या. याशिवाय ते बॉलिवूडमध्येही झळकले. आशुतोष गोवारीकर दिग्दर्शित ‘पानिपत’ चित्रपटातही त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारली होती.
१९८० चा काळ गाजवणारा लोकप्रिय अभिनेता म्हणजे रविंद्र महाजनी त्याकाळी मराठीतील हँडसम हंक म्हणून रविंद्र महाजनी यांच्याकडे पाहिलं जायचं.लोकप्रिय अभिनेत्याचा असा शेवट झाला आहे, हे खूपच वेदनादायी आहे.
Edited by - Satish Daud
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.