रश्मी पुराणीक -
मुंबई : राज्यातील ओबीसी राजकीय आरक्षणाच्या प्रकरणावरती आज छगन भुजबळ यांनी महत्वाचं वक्तव्य केलं आहे ते म्हणाले, 'सुप्रीम कोर्टात राज्यसरकार प्रतिज्ञापत्र सादर करणार आहे की, निवडणूका घ्यायच्या तर संपूर्ण निवडणूका घ्या, नाहीतर निवडणूका पुढे ढकला; असं प्रतिज्ञापत्र सादर करणार असल्याची माहिती अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी दिली आहे.
हे देखील पहा -
तसेच टप्याटप्यांमध्ये निवडणूक घेता येणार नाही, अन्यथा सर्व निवडणूक पुढे ढकला, इम्पीरिकल डेटा आम्ही देतो. तो गोळा होईपर्यंत निवडणूक घेण्याची परवानगी द्या. राज्य सरकार (State Goverment) निवडणुकांबाबत कोर्टासमोर दोन भूमिका मांडणार सुप्रीम कोर्टासमोर (Supreme Court) आम्ही जात आहोत. सुप्रीम कोर्टात राज्यसरकार प्रतिज्ञापत्र सादर करणार आहोत असही भुजबळ म्हणाले.
तोपर्यंत निवडणुका घेऊ नये -
ओबीसी आरक्षण मिळत नाही तोपर्यंत निवडणुका घेऊ नयेत ही मागणी करणार, अथवा ओबीसी स्थगिती न देता संपूर्ण निवडणुका घेण्याची परवानगी द्यावी. अशी विनंती करणार असून निवडणूका दोन टप्प्यात घेण्याने चुकीचा पायंडा पडेल असही ते म्हणाले.
पुढील आठ महिन्यात इम्पिरीकल डेटा (Imperial Data) आम्ही सादर करू असे न्यालायला सांगणार सांगणार असल्याचं ते म्हणाले. शिवाय आपण आज दिल्लीला जाणार असून ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका नकोच, हीच भूमिका राज्यसरकार सुप्रीम कोर्टात मांडणार असल्याच त्यांनी स्पष्ट केलं.
Edited By - Jagdish Patil
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.