Makar Sankranti: साजरा करताना आरोग्याची काळजी घ्या, नायलॉन मांजा टाळा- छगन भुजबळ

Makar Sankranti 2022: नायलॉन मांजा न वापरता पारंपरिक मांजा वापरून उत्सव साजरा करावा असे आवाहन त्यांनी यावेळेस केले.
Chhagan Bhujbal about Makar Sankranti
Chhagan Bhujbal about Makar SankrantiSaam Tv

मुंबई: मकर संक्रांतीचा सण साजरा करताना नागरिकांना आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी केले आहे. (Take care of health while celebrating Makar Sankranti, avoid nylon manja- Chhagan Bhujbal)

हे देखील पहा -

मकर संक्रांतीच्या (Makar Sankranti) राज्यातील नागरिकांना शुभेच्छा देताना मंत्री छगन भुजबळ म्हणाले की मकर संक्रांतीचा सण म्हंटल्यावर अनेक नागरिक मोठ्या उत्साहाने पतंग (Kite) उडवत असतात. मात्र आपला सण साजरा करताना इतर कोणालाही इजा होणार नाही याची काळजी आपण सर्वांनी घेतली पाहिजे. पतंग उडवताना मोठ्या प्रमाणावर नायलॉन मांजाचा (Nylon Manja) वापर तरुणांकडून होत असतो नायलॉन मांजामुळे पशु-पक्ष्यांना तसेच मानवी जीवीताला देखील धोका असल्याने नायलॉन मांजा न वापरता पारंपरिक मांजा वापरून उत्सव साजरा करावा असे आवाहन त्यांनी यावेळेस केले.

Chhagan Bhujbal about Makar Sankranti
Shirdi Temple: कोरोनाच्या निर्बंधांमुळे साई संस्थानच्या दानपेटीवर परिणाम

संक्रांतीचा सण संपूर्ण राज्यभरात उत्साहात साजरा होत असतो, मात्र देशभरात कोरोना (Corona) संकटाने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. त्यामुळे सण साजरे करत असतानाच आपल्या आरोग्याची काळजी देखील आपण घ्यायला हवी. गरज नसल्यास घराबाहेर जाणे टाळा, मास्कचा वापर करा, हात स्वच्छ धुवा, सॅनिटायझरचा वापर करा आणि सर्वात महत्वाचे म्हणजे सर्वांनी लसीकरण करून घ्यावे असे आवाहन देखील त्यांनी यानिमित्ताने केले आहे.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com