नवी मुंबई महानगरपालिकेच्या भ्रष्टाचाराबाबत विधान परिषदेत सुरेश धस उठवणार आवाज !
नवी मुंबई महानगरपालिकेच्या भ्रष्टाचाराबाबत विधान परिषदेत सुरेश धस उठवणार आवाज !saamtvnews

नवी मुंबई महानगरपालिकेच्या भ्रष्टाचाराबाबत विधान परिषदेत सुरेश धस उठवणार आवाज !

नवी मुंबई महानगरपालिकेच्या भ्रष्टाचाराच्या कारभाराबाबत विधान परिषदेत आवाज उठवणार

विकास मिरगणे

नवी मुंबई : महानगरपालिकेतील कारभाराबाबत आणि प्रश्नचिन्ह निर्माण होताना दिसून येत आहेत. महापालिकेचा भ्रष्टाचार (Curroption) संपता संपेना अशी म्हणण्याची वेळ आता आली आहे. नवी मुंबई महानगरपालिकेच्या (Navi Mumbai Municipal Corporation) कारभाराबाबत सत्ताधारी आणि विरोधी पक्ष कधीच आवाज उठवताना दिसून येत नाही आता याबाबत भाजपचे आमदार सुरेश धस (Suresh Dhas) यांनी महापालिकेच्या कारभारात बाबत विधानपरिषद मध्ये आवाज उठवणार आहे.

स्वच्छ सर्वेक्षण अभियान 2021 मध्ये नवी मुंबई महानगरपालिकेला संपूर्ण देशात 5 वे स्थान प्राप्त केले होते. सदर स्थान प्राप्त करण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिके मार्फत नियमांची पायमल्ली करून संगनमताने घनकचरा विभाग, सार्वजनिक बांधकाम विभागांनी नियमबाह्य कामे करुन (केंद्रीय दक्षता आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वांविरुध्द) मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार केलेला आहे, स्वच्छ सर्वेक्षण 2021 मध्ये भिंती रंगवणे या कामासाठी 3 ते 4 लाखाचे छोटे-छोटे तुकडे करून एका प्रभागास 3 कोटी रुपयापर्यंतची कामे. आयुक्तांच्या मान्यतेनुसार निविदा न काढता मार्च 2021 पर्यंत कामे केलेली असणे, सदर कामांच्या निविदा 1 एप्रिल नंतर प्रसिद्ध करून त्याची बिले काढण्यात आलेले असुन यांमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाला आहे. असा आरोप धस यांनी केला आहे.

हे देखील पहा-

याबाबत शासनाकडून अद्याप काहीही कारवाई करण्यात आलेली नाही, नवी मुंबई पालिका घनकचरा विभागात स्वच्छ सर्वेक्षण 2021 मध्ये विभाग प्रमुख हे प्रतिनियुक्ती वरील अधिकारी श्री. बाबासाहेब राजाळे हे महानगरपालिकेत 3 वेळेस प्रतिनियुक्तीवर नियमबाह्यपणे कार्यरत असुन राज्य शासनाच्या प्रतिनियुक्ती च्या धोरणाच्या शासन निर्णयानुसार एखाद्या आस्थापनेवर जास्तीत जास्त 2 टर्म अथवा 10 वर्षापेक्षा जास्त कालावधी प्रतिनियुक्ती देता येत नसतानाही राजाळे यांना 12 वर्षांपेक्षा जास्त प्रतिनियुक्ती देण्यात आलेली आहे.

नवी मुंबई महानगरपालिकेच्या भ्रष्टाचाराबाबत विधान परिषदेत सुरेश धस उठवणार आवाज !
पंढरपूर : पंढरीत दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांवर चोरट्यांनी नजर !

त्यांना मागील 13 वर्षांपासुन घनकचरा विभागाचा पदभार देण्यात आलेला असुन त्यांच्या काळात नवी मुंबईच्या घनकचरा विभागात साफसफाईचे कंत्राट देताना केंद्रीय दक्षता आयोगाचे मार्गदर्शक सूचना एकाच कामाचे एकच निविदा प्रसिद्ध न करता तुकडे करून मर्जीतील कंत्राटदाराला कंत्राटदाराला कामे दिल्याबद्दल महानगरपालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्याकडे तक्रार देण्यात आली. यांच्याकडे वारंवार तक्रारी होऊन सुद्धा त्यांनी कसल्याही प्रकारची दखल न घेता उलट संबंधितांना संरक्षण देऊन सदर भ्रष्टाचाराला प्रोत्साहन दिलेले असल्याने या संपुर्ण प्रकरणाची सखोल चौकशी होवुन जबाबदार दोषी अधिका-यांवर कारवाई करावी यासाठी सभागृहात आमदार सुरेश धस लक्षवेधी मांडणार आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com