
Supriya Sule : अतिशय असंवेदनशील हे ईडीचे सरकार आहे. पक्ष फोडणे, लोकांना दमदाटी करणे यात ते एवढे व्यस्त आहेत की सर्वसामान्य जनतेचे प्रश्न आणि त्यातून शेतकऱ्यांचे प्रश्न त्यांना समजत नाहीत. त्यांच्याकडे लक्ष देत नाहीत असं खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी येथे (Baramati) नमूद केले.
आज मंत्रालय समाेर उस्मानाबाद येथील एका शेतक-यानं आत्मदहनाचा प्रयत्न केला. त्याबाबत खासदार सुळे यांना हे सरकार शेतक-यांसाठी कमी पडत आहे का असं विचारलं असता त्या म्हणाल्या अडचणीच्या काळातील शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत मिळावी यासाठी स्वतः अजितदादा देखील बोलले होते. आज दादांनी शेतकऱ्यांचा विषय काढला आणि त्यावर चर्चा होणार होती.
सुळे म्हणाल्या आमची सगळ्यांची अपेक्षा होती महाराष्ट्र सरकारनं शेतकऱ्यांसाठी काहीतरी मदत करावी परंतु या सरकारवर शेतकऱ्यांचा विश्वासच नसल्यामुळे संबंधित शेतकऱ्यानं टोकाचे पाऊल उचललं असावे. या सगळ्याला हे ईडीचे सरकार जबाबदार असून पक्ष फोडून पन्नास कोटी त्या लोकांच्या घरात जाण्यापेक्षा हे पैसे कष्ट करणाऱ्या शेतकऱ्यांना (farmer) दिले असते तर बरं झालं असतं.
Edited By : Siddharth Latkar
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.