Bhima-Koregaon Case: तत्कालीन पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुतेंची पुन्हा साक्ष नोंदवणार...

Bhima-Koregaon Violence: तत्कालीन पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुतेंची पुन्हा साक्ष नोंदवणार; कोरेगाव भीमा प्रकरणी आयोगाची माहिती...
Superintendent of Police Tejaswi Satpute will testify again in bhima koregaon violence case
Superintendent of Police Tejaswi Satpute will testify again in bhima koregaon violence caseSaam Tv
Published On

पुणे: कोरेगाव-भीमा चौकशी आयोग पुन्हा पुणे ग्रामीणच्या तत्कालीन पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते (Tejaswi Satpute) यांच्यासह वढू बुद्रुक आणि कोरेगाव-भीमा येथील स्थानिक नागरिक संभाजी शिवले, बाळासाहेब जमादार आणि रमेश गलांडे यांची साक्ष नोंदवणार आहे. येत्या 21 ते 25 मार्च दरम्यान ही सुनावणी पुण्यात घेतली जाणार आहे, अशी माहिती चौकशी आयोगाचे सचिव व्ही. पाळनिटकर यांनी दिलीय. (Superintendent of Police Tejaswi Satpute will testify again in bhima koregaon violence case)

हे देखील पहा -

Superintendent of Police Tejaswi Satpute will testify again in bhima koregaon violence case
मुबंई गोवा महामार्गावर भीषण अपघात; मालवाहू कंटनेर थेट घुसला घरात

पुण्यातील जुन्या जिल्हा परिषदेच्या इमारतीत 21 ते 25 मार्च दरम्यान सकाळी 11 ते सायंकाळी 5 दरम्यान चौकशी आयोगाची सुनावणी होणार आहे. कोरेगाव-भीमा (Bhima-Koregaon) येथे 01 जानेवारी 2018 रोजी घडलेल्या हिंसाचारावेळी (Violence) तेजस्वी सातपुते या पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक पदावर कार्यरत होत्या, त्यामुळे कायदा-सुव्यवस्थेच्या दृष्टीने त्याची साक्ष नोंदवण्यात येणार आहे.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com