लांबचे परिक्षा केंद्र मिळाल्याने विद्यार्थी आणि पालकांमध्ये नाराजी...

विद्यार्थी राहतात त्या शहरात किंवा आजूबाजुच्या शहरात परिक्षा केंद्र द्यावे अशी मागणी विद्यार्थी आणि पालकांनी केली आहे.
लांबचे परिक्षा केंद्र मिळाल्याने विद्यार्थी आणि पालकांमध्ये नाराजी...
लांबचे परिक्षा केंद्र मिळाल्याने विद्यार्थी आणि पालकांमध्ये नाराजी...प्रदीप भणगे
Published On

डोंबिवली : आरोग्य विभागाच्या रद्द झालेल्या भरती परीक्षांच्या सुधारित तारखा राज्य सरकारने जाहीर केल्या आहेत. आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी याबाबतची घोषणा केली आहे. सोमवारी दुपारी २ ते ३ तास बैठक झाली त्यामध्ये २४ ऑक्टोबर रोजी गट क ची परीक्षा तर ३१ ऑक्टोबर रोजी गट ड ची परीक्षा होणार आहे. (Students and parents dissatisfied with the long distance of examination centre)

हे देखील पहा -

आरोग्य विभागाच्या गट क संवर्गातील २,७३९ आणि गट ड संवर्गातील ३,४६६ अशा एकूण ६,२०५ पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. यासाठी राज्यातील १५०० केंद्रांवर एकाच वेळी परीक्षा घेतली जाणार आहे. मात्र परिक्षाचे केंद्र पुणे शहरात आल्याने डोंबिवलीमधील विद्यार्थ्यांना अडचणी निर्माण झाल्या आहेत. तर हे केंद्र बदलून जिथे विद्यार्थी राहतात त्या शहरात किंवा आजूबाजुच्या शहरात केंद्र द्यावे अशी मागणी विद्यार्थी आणि पालक यांच्याकडून केली जात आहे.

डोंबिवली पश्चिम आनंदनगर मधील रहिवासी चंद्रकांत धाकू राणे यांची मुलगी प्रणाली राणेंनी महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभागाची परीक्षासाठी अर्ज दाखल केला होता.आधी परीक्षा सप्टेंबर महिन्यात होती आणि  डोंबिवलीमधील प्रगती कॉलेज मध्ये परिक्षा केंद्र आले होते. ही परीक्षा काही कारणामुळे रद्द करण्यात आली आणि आता 24 ऑक्टोबरला ठेवण्यात आली. मात्र आता पुण्यात परिक्षा केंद्र आल्याने जाणार कसे असा प्रश्न विद्यार्थी आणि पालक यांच्याकडून उपस्थित केला जातो आहे.

लांबचे परिक्षा केंद्र मिळाल्याने विद्यार्थी आणि पालकांमध्ये नाराजी...
पोट भरण्यासाठी खाडीचा हातभार...

डोंबिवलीमधील प्रणाली राणे हिचे म्हणणे आहे की, मी डोंबिवलीत राहते, एकटी मुलगी पुण्याला जाऊन परीक्षा देऊ शकत नाही. कोविडमुळे आर्थिक परिस्थिती बिकट आहे आणि रेल्वे मध्ये सुद्धा प्रवास करता येणार नाही. पुण्याला कोण ओळखीचे नाही त्यामुळे राज्य शासनाने ज्या शहरात आम्ही राहतो त्या शहरातच परिक्षा केंद्र दिले पाहिजे.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com