'तो' माणूस वाचण्यासाठी काहीही करु शकतो; फडणवीसांनी आरोप केलेल्या वकीलांचे वक्तव्य

'अचानक नसतं हे गुन्हेगार हा गुन्हेगार असतो, तेजस मोरेंच्या विरोधात काही लीगल ऍक्शन घेणार.'
Tejas More/Pravin Chavhan
Tejas More/Pravin ChavhanSaam TV
Published On

पुणे : जो माणूस खोलात बुडालेला असतो तो वाचण्यासाठी काहीही करु शकतो, असं वक्तव्य सरकारी वकील प्रविण चव्हाण (Public Prosecutor Pravin Chavan) यांनी तेजस मोरे बद्दल केलं आहे. मोरेबद्दल माझ्या मनात आकस येण्याचं काहीच कारण नव्हतं, मग प्रश्न असा येतो त्याने असं का केलं मग मी ज्या केसमध्ये वकील होतो ते आरोपी आणि हा एकच वॉर्ड मध्ये होते त्यामुळे या वकिलाला कसं अडकवता येईल याबाबत त्यांचा विचार झाला असावा, की तू काहीतरी कर आणि या वकिलाला अडकव, बाहेर आलो की आम्ही तुला पैसे देतो जो माणूस खोलात बुडालेला असतो तो वाचण्यासाठी काहीही करु शकतो असं चव्हाण म्हणाले आहेत. याबातचा खुलासा त्यांनी सामच्या रिपोर्टनी प्रश्न विचारला असता केला आहे

माजी मुख्यमंत्री तथा विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी विधानसभेत 'पेनड्राईव्ह बॉम्ब' फोडत सरकारी वकील प्रवीण चव्हाण (Pravin Chavan) आणि राज्य सरकारमधील नेत्यांवर गंभीर आरोप केले आहेत. या सर्व प्रकरणात फडणवीस यांना हा सर्व डाटा पुरवण्याचं काम तेजस मोरे (Tejas More) याने केलं असल्याचा आरोप सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांनी केला होता तर तेजस मोरे याने चव्हाण यांच्यावरती अनेक गंभीर आरोप केले आहेत. महाजनांनतंर फडणवीसांना अडतवण्याचा त्यांना प्लॅन असल्याचही त्याने साम टिव्हीशी बातचित करताना सांगितलं होत. मात्र मोरेच्या या आरोपांवरती आता चव्हाण यांनी प्रत्युतर दिलेलं आहे.

रिपोर्टर प्रश्न - तेजस मोरे ने तुमच्यावर जे आरोप केलेत त्यावर तुमचं काय म्हणणं आहे?

अॅडव्होकेट प्रवीण चव्हाण- त्याला विचारा त्याच्यावर किती गुन्हे दाखल आहेत, किती लोकांना फसवलंय, त्याची लिस्ट काढा.

रिपोर्टर- त्याच्यावर जे गुन्हे दाखल आहेत, त्यातील मोठ्या गुन्ह्यात तुम्ही त्याचा जामीन मिळवून दिला होता, त्यामुळे त्याच्यासाठी तुम्ही देवमाणूस होता 

चव्हाण- त्याच्या आड त्याने हे सगळं केलं ना? त्याची यादी काढली ना मग आपल्या लक्षात येईल, पण या बेल आधी किती गुन्हे दाखल आहेत? ही जर यादी काढली  मग लक्षत येईल. तो बेलच्या निमित्तानेयायचा, मॅन्युपलेशन करुन त्याला करोडो रुपये कमवायचे होते ज्या गुन्ह्यांमध्ये मी वकील होतो ते कैदी आणि हा सोबत होता एकाच वॉर्ड मध्ये होते, कैदी सोबत असल्याने सुपारी घेऊन त्याने हा सर्व प्रकार केला, मॅन्युपलेशन केलं.

रिपोर्टर- आज भेटू शकाल का?

Tejas More/Pravin Chavhan
महाजनांनंतर फडणवीसांचा नंबर, मी चव्हाणांना देव मानायचो; तेजस मोरेचे धक्कादायक खुलासे (पहा Video)

चव्हाण- मी माझे सर्व कामे धंदे सोडायचे आणि मिडिया पुढे यायचे का? माझा ऑफिशियल टाईम असतो, कोर्ट वर्किंग असतं, हे सर्व। बंद करुन मिडियासमोर येऊन बसायचे का? तुम्ही येऊ शकता

रिपोर्टर- त्याने इतके गंभीर आरोप केलेत तर तुम्ही बोललं पाहिजे

चव्हाण - मी सांगतो ना, गंभीर आरोप कोण करु शकतो? त्याला जर माहिती होतं तर त्याने पोलिसांना का नाही कळवलं, इन्फॉर्मेशन नाही दिली कारण त्याच्यातून मॅन्युपलेट करुन त्यातून पैसे कमवायचे होते. मी जामीन करायच्या आधीही तेजस मोरेवर मोठे गुन्हे दाखल आहेत, त्या गुन्ह्याची मोठी लिस्ट आहे. जामिनाच्या निमित्ताने तो यायचा, कारण मॅन्युपलेशन करुन त्याला मला फसवायचे होते, करोडो रुपये कमवायचे होते,

रिपोर्टर- इतके दिवस तुमच्या सोबत असणारा तुमच्या विरोधात जातो, असं अचानक काही घडलं होतं का?

चव्हाण - अचानक नसतं हे गुन्हेगार हा गुन्हेगार असतो, हे त्याने प्लॅनिंग करून पाहिलं त्याच्यावर करोडो रुपयांची लायबलिटी आहे, त्यामुळे या वकिलाला आपण फसवलं आणि इतर आरोपींना दिलं, तर त्या केसमधून हा वकील बाजूला होईल, मग तुमची बेल होईल मग तुम्ही किती पैसे देता? ही त्याची प्लॅनिंघोटी, हे चौकशीतून येईल ना बाहेर.

त्याचं असं होतं का की मी त्याचं काही नुकसान केलं होतं? , बेल केला नव्हता, फी घेऊन काम केलं नव्हतं, असं काहीच नव्हतं, त्यामुळे त्याच्याबद्दल माझ्या मनात आकस येण्याचं काहीच कारण नव्हतं, मग प्रश्न असा येतो त्याने असं का केलं मग मी ज्या केसमध्ये वकील होतो ते आरोपी आणि हा एकच वॉर्ड मध्ये होते त्यामुळे या वकिलाला कसं अडकवता येईल याबाबत त्यांचा विचार झाला असावा, की तू काहीतरी कर आणि या वकिलाला अडकव, बाहेर आलो की आम्ही तुला पैसे देतो जो माणूस खोलात बुडालेला असतो तो वाचण्यासाठी काहीही करु शकतो,

रिपोर्टर प्रश्न- तुम्ही तेजस मोरेंच्या विरोधात काही लीगल ऍक्शन घेणार आहात का

चव्हाण - घेणार आहे ना लीगल ऍक्शन घेणार आहे.

या चव्हाणांच्या वक्तव्यावरुन आता ते देखील मोरे विरोधात आक्रमक भूमिका घेणार असल्याचं दिसतय तर, मोरे यांने देखील आपण वकीलांविरोधात पुरावे सादर करणार असल्याचं सांगितल्याने या प्रकरणाला नवं वळण लागलं आहे.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com