CoronaVirus: राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील दुसऱ्यांदा कोरोना पॉझिटिव्ह

राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील हे दुसऱ्यांदा कोरोना पॉझिटिव्ह झाले आहेत. याअगोदर त्यांना २९ ऑक्टोबर २०२० रोजी कोरोनाची लागण झाली होती.
CoronaVirus: राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील दुसऱ्यांदा कोरोना पॉझिटिव्ह
CoronaVirus: राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील दुसऱ्यांदा कोरोना पॉझिटिव्हSaam Tv

मुंबई: राज्याचे गृहमंत्री तथा राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे-पाटील हे दुसऱ्यांदा कोरोना पॉझिटिव्ह झाले आहेत. त्यांनी स्वतः याबाबत ट्विटरद्वारे माहित दिली आहे. याअगोदर त्यांना २९ ऑक्टोबर २०२० रोजी कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर ३६४ दिवसांनी म्हणजे आज २८ ऑक्टोबर २०२१ रोजी त्यांना पुन्हा कोरोनाची लागण झाली आहे. विशेष म्हणजे दोन दिवसांनी म्हणजे ३० ऑक्टोबर रोजी त्यांचा ६५ वा वाढदिवस आहे, मात्र त्याआधीच त्यांना कोरोनाची लागण झाल्यानं ते विलगीकरणात गेले असून त्यांची प्रकृती उत्तम असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. (State Home Minister Dilip Walse-Patil tested corona positive for the second time)

हे देखील पहा -

आपल्या प्रकृतीबद्दल माहिती देताना गृहमंत्री म्हणाले की, ''कोरोना सदृश्य लक्षणे दिसत असल्याने मी माझी टेस्ट केली असून माझा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. प्रकृती स्थिर असून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार वैद्यकीय उपचार सुरू केले आहे. नागपूर व अमरावती दौऱ्यादरम्यान तसेच इतर कार्यक्रमाप्रसंगी माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांना माझे आवाहन आहे की, त्यांना लक्षणे आढळून आल्यास कोरोना टेस्ट करून घ्यावी. शक्यतो गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे व कोरोना नियमांचे काटेकोर पालन करावे.''

CoronaVirus: राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील दुसऱ्यांदा कोरोना पॉझिटिव्ह
Akola: इंग्लंड विरुद्ध बांगलादेश सामन्यावर सट्टा; तिघांना अटक

राज्यात कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात येत असल्याने अनलॉक प्रक्रिया सुरु आहे, मात्र त्यामुळे गर्दी वाढून कोरोना संसर्ग पसरु शकतो असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. काही दिवसांपुर्वीच मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे देखील कोरोनाबाधित आढळले होते, सोबतच त्यांच्या मातोश्रींनाही कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग कमी झाला असला तरी तो पुर्णपणे संपलेला नसल्याने कोरोनाचे नियम पाळले पाहिजेत असं तज्ज्ञ वारंवार सांगत आहेत.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com