मुंबई : राष्ट्रवादीचे (NCP) अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबईतील निवासस्थानी एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन करुन हल्ला केला. हा हल्ला केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी १०९ एसटी कर्मचाऱ्यांसह वकील गुणवंत सदावर्ते यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. याप्रकरणी पोलिसांनी नागपुरातील एसटी (ST) कर्मचारी संदीप गोडबोले यांना अटक केली. संदीप गोडबोले आंदोलक एसटी कर्मचारी आणि वकील सदावर्ते यांच्या संपर्कात होते, यामुळे त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. आज त्यांना कोर्टात हजर करुन सरकारी वकील प्रदीप घरत यांनी त्यांचे व्हॉट्सअप संभाषण वाचून दाखवले.
'संदीप यांच्या सांगण्यावरून आंदोलक जमा झाले. या आंदोलनातील संदीप हा मुख्य आरोपी आहे. त्यांनी आणि इतरांनी हा कट रचला आहे. या आरोपीकडे कटाची चौकशीसाठी करणे महत्वाचे आहे. गोडबोले या सगळ्या कटात सूत्रधार म्हणून काम पाहत होता. त्याला आज कोर्टाने १६ एप्रिलपर्यंत कोठडी सुनावली आहे. गोडबोले हे आमदार निवासमध्ये थांबले होते. संदीपने कोर्टासमोर स्वतः हे मान्य केलं आहे. कोणत्या आमदाराच्या ओळखीवरून तो आमदार निवासला थांबला हे तपासायच आहे चौकशी केली जाईल, असंही सरकारी वकील प्रदीप घरत यांनी सांगितले.
हे देखील पहा
पोलिसांच्या हाती अभिषेक पाटील आणि नागपूरातून ताब्यात घेतलेले संदीप गोडबोल यांचे व्हाॅट्स अॅप चॅट हाती लागले आहेत. ते आज कोर्टात सादर करण्यात आले आहेत.
हे आहे व्हॉट्सअप संभाषण
अभिषेक - हॅलो
संदीप - बोल अभिषेक
अभिषेक - तिथेच जाऊ का ?
संदीप - हा तिथेच जायचे
अभिषेक - आम्ही त्या बंगल्याच्या इथे चपला सोडल्या, आम्ही लवकर अगोदर आलो, आम्ही फोटो पण काढलेत, तिथे आता लय लोक आलेत, काढले ना लोक म्हणून तर हे काय झाले साहेब, करावं तर सगळं आपणचं करावं, बाकिचे निवांत बसावं, इथे येऊन साहेबांना लगेच सांगितलं, मुदलियार पाटील आतच आलेत. आता रात्रभर मैदानात आलेत, सकाळी ९ पर्यत अंगोळ करून पण येऊ नये का ?
संदीप - आता कुठे आहेत तुम्ही कुठे आहात आता
अभिषेक - हा इथे सगळ्या महिला घेतल्यात, डायरेक्ट त्यांना तिकिटांना पैसे दिलेत. तिकिट काढलेत निघालेत सगळे, ७० ते ८० महिला आणि माणसं आहेत १०० ते २००
संदिप - महालक्ष्मी पेट्रोलपंप कुठे आहे विचारा
अभिषेक - पेट्रोलपंपवर ना मिडिया आली
संदिप - मिडिया आली आहे
अभिषेक - चला मिडिया आली भाऊ
संदीप - हो
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.